‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरीच्या ‘घागरा’ गाण्याची धमाल; जबरदस्त डान्सने लावली सोशल मीडियावर आग


हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी तिच्या डान्समुळे अनेकदा चर्चेत असते. तिचे चाहते केवळ हरियाणापुरते मर्यादित नाहीत, तर देश आणि विदेशातही आहेत. सपनाने ‘बिग बॉस’मध्ये पाऊल टाकल्यापासून तिला जगभरात ओळख मिळाली. अर्थात ती शो जिंकू शकली नाही, पण तरीही ती लोकांच्या हृदयावर राज्य करते. यामुळेच तिचा प्रत्येक डान्स व्हिडिओ ट्रेंडिंग लिस्टमध्ये राहिला आहे. तिचे एनर्जीने भरलेले जबरदस्त डान्स प्रेक्षकांना वेड लावतात. ‘डान्सिंग क्वीन’च्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सपना चौधरीचा डान्स एकदा पाहिल्यानंतर कदाचित तो आयुष्यभर विसरणे कठीण आहे. सपना चौधरीची गाणी यूट्यूबवर प्रचंड वेगाने व्हायरल होतात. ज्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम देखील मिळते.

तिची नवीन आणि जुनी गाणी यूट्यूबवर नेहमीच धुमाकूळ घालतात. सपनाच्या प्रत्येक म्युझिक व्हिडिओवर व्ह्यूज आणि लाईक्सचा तिचे चाहते वर्षाव करत असतात. अलीकडेच सपना चौधरीचा नवीन डान्स व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. तिच्या नवीन डान्स व्हिडिओमधील ‘घागरा’ या गाण्यातील तिच्या सिझलिंग डान्सला तिचे चाहते प्रचंड पसंती देत आहेत. तिचा हा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर वेगाने व्हायरल होत आहे.

या गाण्यात सपनाने हिरव्या रंगाच्या सूटवर लाल रंगाची ओढणी घेतलेली दिसत आहे. ती तिच्या पतीकडून घागरा आणि ओढणी मागत आहे. गाण्यात अभिनेता विवेक राघव तिच्यासोबत दिसत आहे. या गाण्यात सपना तिच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हे गाणे अतिशय देसी स्टाईलमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.

हा म्युझिक व्हिडिओ एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून या गाण्याला ४ कोटी ५३ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे पवन सरोहा यांनी लिहिले आहे आणि सोनोटेक म्युझिक वर्ल्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहे.

सपनासोबत तिचा दमदार अभिनय देखील या गाण्यात दिसणार आहे. या गाण्याला संगीत जीआरपी ब्रदर्सने दिले आहे. तसेच दिग्दर्शक मुनीश शर्मा आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.