‘तुहाडा कुत्ता टॉमी’ गाण्यावर जोरदार भांडताना दिसले दीपिका अन् रणवीर; मजेशीर व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण होय. दीपिका ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या नवनवीन पोस्ट चाहत्यांना खूप आवडत असतात. तिच्या मजेशीर व्हिडिओला देखील प्रेक्षक जोरदार प्रतिसाद देत असतात. तिची आणि रणवीर सिंगची जोडी खूप लोकप्रिय आहे. या जोडीचे इंडस्ट्रीमध्ये कौतुक होत असते. या लव्ह बर्ड्सचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. त्या दोघांनी हा एक मजेशीर व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका आणि रणवीर ‘तुहाडा कुत्ता टॉमी’ या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ( Deepika Padukone and Ranveer Singh’s funny video viral on social media)

दीपिका पदुकोणने त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दीपिका आणि रणवीर ‘तुहाडा कुत्ता टॉमी’ या गाण्यावर डान्स करत आहेत. यामध्ये दीपिकाने हिरव्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पँट परिधान केली आहे. तर रणवीरने पांढरा टी-शर्ट घातला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही मजेशीर अंदाजात भांडताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत दीपिकाने कॅप्शन लिहिले आहे की, “कारण आज तुझा वाढदिवस आहे. मी यावर म्हणू इच्छिते की, तुहाडा कुत्ता टॉमी सडा कुत्ता कुत्ता है.” त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दीपिका पदुकोणच्या या मजेशीर व्हिडिओला आतापर्यंत २.९ मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओवर ९४४६ पेक्षाही जास्त कमेंट आल्या आहेत.

दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटात तिच्यासोबत किंग खान म्हणजेच शाहरुख खान होता. तिने आणि रणवीर सिंगने बऱ्याच चित्रपटात एकत्र केले आहे. त्यांनी ‘पद्मावत’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले. तसेच ते त्यांच्या ‘८३’ या आगामी चित्रपटात देखील एकत्र काम करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.