‘देवदास’ची १९ वर्षे: तब्बल १२ कोटी रुपयांमध्ये तयार झाला चंद्रमुखीचा कोठा; तर ६०० साड्यांना मिक्स करून बनवली होती ऐश्वर्याची साडी


हिंदी सिनेसृष्टीमधे संजय लीला भन्साळी हे नाव उच्चारले की, डोळ्यासमोर येतात भव्य दिव्य सेट, भरजरी कपडे, दर्जेदार गाणी, धमाकेदार संगीत, दमदार कलाकार आदी. संजय हे इंडस्ट्रीमधील अतिशय हुशार आणि अभ्यासू दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्या प्रत्येक सिनेमातून ते काहीतरी वेगळे आणि उत्कृष्टच देतात. संजय यांचा सिनेमा खर्चिक तर असतो, शिवाय त्याला प्रेक्षकांच्या प्रेमासोबत पुरस्काररूपी शाबासकी देखील मिळते. संजय यांनी आजपर्यंत अतिशय सुंदर आणि पठडी बाहेरील सिनेमे प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. २००२ साली संजय यांनी ‘देवदास’ हा सिनेमा तयार केला होता. शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा तुफान गाजला. आज या सिनेमाला प्रदर्शित होऊन १९ वर्ष पूर्ण झाली आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया या सिनेमाच्या काही महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी.

देवदास हा त्या काळातला सर्वात महाग बजेट असलेला सिनेमा होता. त्यावेळी हा सिनेमा ५० कोटी रुपयांमध्ये तयार झाला होता. हे बजेट त्याकाळी इतके मोठे होते की, चित्रपटाचे निर्माते भरत शाह यांना २००१ साली अटक देखील केली होती. तपासात असे समोर आले की, त्यांच्या एका सिनेमात अंडरवर्ल्डचा पैसा लागला आहे. मात्र तेव्हा देवदास प्रदर्शित झाला नव्हता.

चित्रपटाचा सेट पाहून डोळे दीपतील इतका सुंदर आणि आलिशान सेट तयार केला होता. हा सेट बनवायला चित्रपटाच्या टीमला २/३ महिन्यांचा काळ लागला होता. हा सेट तयार करायला २० कोटी एवढा खर्च आला होता. विशेष म्हणजे चंद्रमुखीचा कोठा तयार करण्यासाठी सर्वात जास्त खर्च केला होता. हा कोठा १२ कोटींमध्ये तयार झाला होता. तर पारोचे घर स्टेंड ग्लासचा वापर करून तयार केले होते. कारण जेव्हा शूटिंग चालू होते तेव्हा पावसाळा सुरु होता. त्यामुळे या काचांना सारखा कलर द्यावा लागत होता. हा सेट बनवण्यासाठी १.२ रुपयांची स्टेंड ग्लास वापरण्यात आली होती.

त्यावेळी सेटवर २/३ जनरेटरचीच गरज असायची. मात्र या सिनेमाच्या सेटवर ४२ जनरेटरचा वापर केला जायचा. शूटिंगच्या वेळी वेगवेगळ्या लाईट्सचा वापर केला जायचा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज लागायची. सिनेमेटोग्राफर बिनोद प्रधानाने विजुअल्ससाठी २५०० लाइट्स वापरले होते. यासाठी ७०० लाइटमॅन काम करायचे.

चित्रपटात माधुरीची वेशभूषा फॅशन डिजाइनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केली होती. त्यावेळी मोठ्या वजनाच्या आणि अतिशय सुंदर कपड्यांचा खर्च १५ लाख इतका झाला होता. ‘काहे छेड़ छेड़ मोहे’ गाण्यात माधुरीने ३० किलोचा घागरा घालून डान्स करणे आव्हानात्मक होते. म्हणून तिचा घागरा जरा हलका करत १६ किलोचा केला गेला. तिचे ड्रेस तयार करण्यासाठी कारागिरांना २ महिन्यांचा कालावधी लागला होता.

फॅशन डिजाइनर नीतू लुल्ला आणि डायरेक्टर संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्याच्या साड्यांसाठी कोलकातामध्ये जाऊन ६०० साड्या खरेदी केल्या होत्या. त्या साड्यांना एकत्र करून तिचे वेगवेगळे लूक तयार केले गेले. ऐश्वर्याला तयार करण्यासाठी नीता यांना ३ तासांचा कालावधी लागायचा. तिच्या साड्या ८/९ मीटर इतक्या मोठ्या होत्या.

या चित्रपटाला इस्माईल दरबार यांनी संगीत दिले. या म्युझिकसाठी आणि गाण्यांसाठी त्यांना दोन वर्षाचा काळ लागला. एका गाण्याची रेकॉर्डिंग १० दिवसांमध्ये व्हायची. मग त्यानंतर ८/९ वेळा त्यांना मिक्स केले जायचे. यादरम्यान इस्माईल दरबार आणि संजय भन्साळी यांच्यामध्ये मतभेद झाले. मात्र नंतर ते नीट देखील झाले. ‘डोला रे डोला’ गाण्यात एक ओळ शेवटच्या मिक्सिंग वेळी नुसरत बद्र यांनी बदलली होती. त्यामुळेही अंधुक खर्च झाला होता.

चित्रपटाच्यासंपूर्ण टीमच्या बेजोड मेहनतीमुळे २००२ साली प्रदर्शित झालेला ‘देवदास’ हा सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा ठरला. या सिनेमाने भारतात ४१.६६ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा त्याकाळी एक रेकॉर्डच होता. या सिनेमाचा प्रिमीयर कंस फिल्म फेस्टिवलमध्ये झाला होता. या चित्रपटाने त्यावर्षीच्या सर्व पुरस्कारांवर बाजी मारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.