धनश्री काडगावकरला मिळाला खास व्यक्तीकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सोशल मीडियावर मानले आभार


मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर होय. तिने झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला‘ या लोकप्रिय मालिकेतून सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. धनश्री देखील इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती प्रेक्षकांना तिच्याबाबत माहिती देत असते. सध्या ती टेलिव्हिजनपासून दूर आहे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडून आहे. अशातच तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

धनश्रीला कशिश प्रोडक्शनकडून ग्लोबल आयकॉन ऑफ इंडिया सिझन २ मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या गोष्टीची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. तिने हा अवॉर्ड स्वीकारताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली आहे. (Dhanashri kadgaonkar recieved best actress award from meghraj raje bhosale)

धनश्रीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे पुरस्कार घेताना दोन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “या अवॉर्डसाठी धन्यवाद कशिश प्रोडक्शन. मी नशीबवान समजते की, मेघराज राजे भोसले यांच्याकडून मला हा पुरस्कार मिळाला.” मेघराज राजे भोसले हे अखिल भारतीय मराठी चित्रपटसृष्टीचे अध्यक्ष आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत आणि तिचे अभिनंदन करत आहेत.

धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका निभावली होती. या भूमिकेने तिला खूप ओळख दिली. परंतु काही दिवसांनी गरोदर असल्याने तिने ही मालिका सोडून दिली. धनश्रीने मागच्या वर्षी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ती तिच्या मुलासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीने या आधी ‘चिठ्ठी’, ‘ब्रेव हार्ट’, ‘गंध फुलाचा गेला सांगून’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ती ‘घेतला वसा टाकू नका’ या पौराणिक मालिकेत दिसली होती.

हेही वाचा :

उर्फी जावेदने शेअर केले मोनोकनीमधील हॉट आणि मादक फोटो, चाहते म्हणाले ‘हाय गर्मी’

‘नाटू नाटू’ गाण्यावर सिद्धार्थ आणि अक्षयाने धरला ठेका, पाहून थिरकतील तुमचेही पाय

यावर्षी ‘या’ कलाकारांच्या मृत्यूच्या उडाल्या होत्या अफवा, अनेक मोठ्या सेलिब्रिटींचा देखील होता समावेश 

 

 


Latest Post

error: Content is protected !!