Thursday, April 18, 2024

ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला मागे, संसाराला देणार आणखी एक संधी

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष जेवढा अभिनयासाठी ओळखला जातो तेवढाच आपल्या तेवढाच आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे देखिल चर्चेत असतो. त्याने आचानकच आपली पत्नी म्हणजेच, सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या रजनीकांत सोबत घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने लाखो चाहत्यांना धक्का बसला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सांगितले होते की, “आमच्या प्रायवेसीचा आदर करा” त्यामुळे चाहत्यांसाठी ही गोष्ट कमी झटका देणारी नव्हती.

अभिनेता धनुष याने अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याला अनेक लोक आपला आदर्श मानतात मात्र, त्याच्या घटस्फोटाच्या बातमीने च्याच्या चाहत्यांचे मन तोडले होते. त्यामुळे त्याने केलेल्या पोस्टवर लाखो चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. साउथ इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या जोडीला लोकप्रिय जोडी म्हणून ओळखले जाते. मात्र, आता या दोघांच्या बाबतीत एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यात हा समेट घडवून आणल्याचे समजते.

माध्यमातील वृत्तानुसार धनुष आणि ऐश्वर्या यांच्या दोन्ही कु़टुंबाने एकत्र बसून यांना समजावून सांगितले की, जे काही वाद झाले आहेत ते सोप्या पद्धतीने मिटवून घ्या. असे सांगत त्यांनी यांची समजूत काढत झालेल्या वादाला मिटवून घेण्याचा निर्णय केला आणि कुटुंबीयांनी यांची घटस्फोटाची प्रक्रिया थांबवली. धनुष आणि ऐश्वर्या यांनी आपल्या नात्याला कुटुंबीयांचा आदर करत अजून एक संधी देण्याचा निर्णय केला आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आधी जेवढे काही वाद झाले असतील ते सगळे मिटवू घेण्याची ही एक संधी कुटुंबीयांनी या जोडप्याला दिली आहे. त्यांमुळे ही बातमी ऐकूण चाहते खूपच खूश झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी स्वत: घटस्फोटाची प्रक्रिया थांबवून मिडियाला ही आनंदाची बातमी दिली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यनच्या ‘आशिकी 3’ वर राहुल रॉयने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आशिकीचा रिमेक…”
आई काजोलसोबत मुलगा युगने भाविकांना वाढले जेवण; चाहते म्हणाले, “छोटा सिंघम…”

हे देखील वाचा