अनेक महिन्यांनी धर्मेंद्र परतले त्यांच्या फार्महाऊसवर, व्हिडिओ शेअर करत सर्वांना दिला कोरोनापासून वाचण्याचा सल्ला


बॉलिवूडचे ‘हिमॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज आणि प्रभावी अभिनेते धर्मेंद्र पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे धर्मेंद्र सोशल मीडियावर देखील सक्रिय आहेत. नेहमीच ते त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टमधून फॅन्स आणि मीडियाचे लक्ष वेधून घेतात. कोरोना आणि लॉकडाऊन काळात त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ त्यांच्या फार्महाऊस वरच वेगवेगळ्या कार्यांमध्ये घालवला.

त्यानंतर ते चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने फार्महाऊसमधून बाहेर पडून बराच काळ ते त्यांच्या या फार्मपासून लांब राहिले. मात्र आता चित्रपटाची शूटिंग संपवून ते पुन्हा एकदा त्यांच्या फार्मवर परतले आहेत. फार्मवर आल्यानंतर ते आता त्यांच्या शेतीच्या कामात व्यस्त झाले आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या फार्महाऊसवरील शेतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये त्यांना जमिनीशी नाळ जोडलेला अभिनेता म्हणून म्हटले आहे.

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते त्याच्या फार्महाऊसेवरील शेतात काम करणाऱ्या लोकांसोबत बोलताना दिसत आहे. यात ते म्हणत आहे की, त्यांनी त्यांच्या शेतात सध्या कांदा लावला असून, पुढे अनेक वेगवेगळी पिके घेण्याची त्यांची इच्छा आहे. यासोबतच ते त्यांच्या कामगारांना कोरोनापासून वाचण्यासाठी सल्ला देखील देत आहे. धर्मेंद्र यांनी हा व्हिडिओ शेअर करताना धर्मेंद्र यांनी या व्हिडिओसोबतच सर्वांना कोरोना पासून वाचण्याचा सर्वांनाच देखील सल्ला दिला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. नाहीतर याला डिलीट करा. तुम्हा सर्वांना खूप प्रेम, काळजी घ्या. हा कोरोना अजूनही तुमच्या आजूबाजूला वेगवेगळ्या नावानी फिरत आहे.”

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ते लवकरच करण जोहरच्या दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ते मोठ्या काळानंतर चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत आलिया भट्ट, रणवीर सिंह, शबाना आजमी, जया बच्चन देखील दिसणार आहे. यानंतर ते त्यांच्या होम प्रॉडक्शनच्या ‘अपने २’ सिनेमातही दिसणार आहे.

हेही वाचा :

मीनल शाहच्या रंगतदार परफॉर्मन्सने रंगला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले, पाहा झलक

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी ‘या’ कारणामुळे लगावली होती अनिल कपूर यांच्या कानशिलात

कलाकारांनी चित्रपटांमध्ये वापरलेल्या ‘या’ वस्तूंचा झाला लाखोंमध्ये लिलाव


Latest Post

error: Content is protected !!