भारतीय संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटूबांने आजपर्यंत असामान्य योगदान दिले आहे. भारतरत्न लता मंगेशकर (lata Mangeshkar) यांनी आपल्या जादूई आवाजाने हिंदी संगीत जगताला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. लता दीदींप्रमाणेच त्यांच्या वडीलांनीही संगीत क्षेत्रात आपल्या जादूई आवाजाची छाप पाडली आहे. त्यामुळेच मंगेशकर फॅमिली आणि संगीत क्षेत्राचे घट्ट नाते पहिल्यापासूनच या देशात पाहायला मिळाले आहे. लता दीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar) यांनीही अभिनय आणि संगीत क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली आहे. २४ एप्रिल दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी.
दीनानाथ मंगेशकर आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर मराठी रंगभूमीच्या जगात अव्वल स्थानी पोहोचले होते, पण त्यासाठी त्यांनी बालपणापासूनच तयारी सुरू केली होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. त्यांनी तरुण वयातच बाबा माशेलकर यांच्याकडून गायन आणि संगीताचे धडे घेतले. याशिवाय ते ग्वाल्हेर संगीत विद्यालयाचे विद्यार्थीही होते. आक्रमक गायन शैलीसाठी ते प्रसिद्ध होते. ते उत्तम गायक आणि संगीतकार तसेच उत्तम अभिनेते होते. त्यांनी चित्रपटांची निर्मितीही केली. 1930 मध्ये त्यांनी ‘कृष्णार्जुन युद्ध’सह तीन चित्रपटांची निर्मिती केली. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता. दीनानाथ मंगेशकर यांनीही या चित्रपटात हे गाणे गायले असून हे गाणेही त्यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
आपल्या संगीत आणि अभिनयाप्रमाणेच ते वैवाहिक आयुष्याबद्दलही चर्चेत राहिले होते. दीनानाथ मंगेशकर यांनी दोन विवाह केले होते. त्यांचे पहिले लग्न गुजरातमधील रहिवासी नर्मदाबेन यांच्याशी झाले होते. नर्मदाबेन यांचे वडील हरिदास हे गुजरातचे प्रसिद्ध जमीनदार होते. दीनानाथ मराठी होते आणि त्या काळात मराठी आणि गुजराती कुटुंबात लग्न होणे ही मोठी गोष्ट होती. लग्नानंतर लवकरच नर्मदाबेन यांचे निधन झाले, त्यानंतर दीनानाथ यांनी १९२७ साली त्यांच्या स्वत:च्या धाकट्या बहीण सेवंतीबेनशी लग्न केले. लग्नानंतर सेवंतीबेन यांचे नाव बदलून सुधामती ठेवण्यात आले. त्यांना लता, मीना, आशा, उषा आणि एक मुलगा हृदयनाथ अशी पाच मुले होती. लता मंगेशकर 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…