‘नॅशनल क्रश’ दिशा पटानीने साजरा केला वाढदिवस, टायगरसोबत बहीण कृष्णा श्रॉफनेही लावली हजेरी


बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘नॅशनल क्रश’ दिशा पटानी ही रविवारी (13 जून) आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवशी अनेक कलाकारांनी तसेच तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक जणांनी तिला सोशल मीडियावरून, तर काहींनी तिला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. दिशाने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दिशा पटानीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिशा पटानी, टायगर श्रॉफ आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफही दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांनी दिशाचा वाढदिवस साजरा केलेला दिसत आहे. यामध्ये तिने केकचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफसोबत पोज देत फोटो काढले आहेत.

या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि रिप्ड जीन्स घातली आहे. या फोटोत तिच्या मागे फुग्यांचे डेकोरेशन दिसत आहे. सगळेजण तिच्या फोटोवर कमेंट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत, तर काहीजण तिला आणि टायगरला परफेक्ट कपल असे संबोधत आहेत.

दिशा ही टायगर श्रॉफसोबत असलेल्या तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केले जाते. केवळ पडद्यावरच नाही, तर वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांची केमिस्ट्री खूप चांगली आहे. त्या दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. पण त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहिले जाते. तसेच सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटो कमेंट करत असतात.

दिशा केवळ एक सुंदर अभिनेत्री नाही, तर एक ऍप डेव्हलपर आहे. तिने एक ऍप डेव्हलप केला आहे. ज्याद्वारे ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचा हा ऍप प्ले स्टोरवर देखील आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘एमएस धोनी’, ‘बाघी 2’, ‘मलंग’, ‘भारत’ आणि ‘राधे’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.