Friday, December 1, 2023

राखीला लवकरात लवकर आदिलपासून हवा आहे घटस्फोट; म्हणाली, ‘मी न्यायाधीशांसमोर नाचायलाही…’

ड्रामा क्वीनराखी सावंत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिचे वैयक्तिक आयुष्य, तर कधी तिचे व्यवसायिक आयुष्य राखी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशात आता पुन्हा एकदा राखी चर्चेत आली आहे. खरे तर, राखीने पॅपराझींसमाेर कबूल केले की, तिच्या आयुष्यात पुन्हा एका नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. मात्र, राखीने असेही म्हटले होते की, यावेळी ती खूपच घाबरली आहे. कारण, तिचे पूर्वीचे लग्न चांगले चालले नव्हते.

राखी (rakhi sawant) हिने असेही सांगितले होते की, मुंबई आणि दुबईमधील डान्स स्टुडिओ व्यवस्थापित करणे तिच्यासाठी खूप कठीण होत आहे, म्हणून ती तिच्या कामात मदत करू शकेल असा जीवनसाथी शोधत आहे. त्याचवेळी, एका नवीन व्हिडिओमध्ये राखी लवकरच घटस्फोट घेणार आहे. असे म्हणताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी डान्स करताना दिसत आहे आणि म्हणत आहे की, ‘जजने मला लवकर घटस्फोट द्यावा. हव तर मी न्यायाधीशांसमोर डान्स करेल. मला घटस्फोट द्या, मला घटस्फोट द्या न्यायाधीश मला लवकर घटस्फोट द्या. कारण, माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही.’ अशा प्रकारे म्हणत राखी हसत – हसत पॅपराझींसमाेरून निघून गेली.

राखी सावंतते आदिल दुर्राणीशी लव्ह मॅरेज केले होते. मात्र, काही वेळानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आराेप केले. राखीने मीडियासमोर सांगितले की, आदिलने तिची फसवणूक केली आहे आणि त्याचे दुसऱ्याशी अफेअर आहे. इतकेच नव्हे, तर राखीने आदिलवर चोरीचा आरोपही केला होता आणि त्याच्याविरुद्ध पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता, ज्यानंतर आदिल तुरुंगात गेला. अलीकडेच राखीने असेही सांगितले होते की, तिला आदिलला तुरुंगातून बाहेर पहायचे आहे, जेणेकरून ती त्याला लवकरात लवकर घटस्फोट देऊ शकेल.(tv actress rakhi sawant wants divorce from adil durrani as soon as possible)

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल
‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने केलं दुसऱ्यांदा लग्न, व्हिडीओ होतोय व्हायरल

हे देखील वाचा