Tuesday, March 5, 2024

ईशा गुप्ताने ‘या’ चित्रपटात दिला होता आतापर्यंतचा सर्वाधिक बोल्ड सीन, सर्व कपडे काढून कॅमेऱ्यासमोरच…

बॉलिवूड इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत ईशा गुप्ताचा (Esha Gupta) समावेश होतो. तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देऊन, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण ‘राज ३’ चित्रपटात ईशा गुप्ताने असा सीन दिला, ज्याची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटात तिने आतापर्यंतचा सर्वात बोल्ड सीन दिला, ज्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बोल्ड सीन देऊन रंगवल्या चर्चा
या चित्रपटात ईशा गुप्ताने बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि इमरान हाश्मीसोबत (Emraan Hashmi) काम केले होते. ईशा गुप्ता वॉशरुममध्ये मेकअप करत असताना, वॉश बेसिनमधून किडे बाहेर येऊ लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे पाहून ईशा खूप घाबरते. जेव्हा ते किडे ईशाच्या अंगाला चिकटू लागतात, तेव्हा ती किंचाळू लागते.

घाबरून काढू लागली कपडे!
यानंतर ईशा गुप्ता घाबरून तिचे सर्व कपडे काढू लागते. याच अवस्थेत ती बाहेर सुरू असलेल्या पार्टीत पोहोचते. त्यानंतर इमरान हाश्मी तिथे पोहोचतो आणि त्याचा कोट काढतो आणि ईशा गुप्ताला घालतो. हा चित्रपटाचा एक अतिशय लोकप्रिय सीन होता, ज्याला ईशा गुप्ताने उत्तमरीत्या साकारले होते. यामुळेच ती खूप चर्चेत आली होती. या चित्रपटात ईशा गुप्ताने इमरान हाश्मीसोबत अनेक इंटिमेट सीन्सही दिले आहते. हा चित्रपट २०१२ मध्ये रिलीझ झाला होता, ज्याचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले होते.

खऱ्या आयुष्यातही बोल्ड आहे ईशा
ईशा गुप्ता केवळ चित्रपटातच नाही, तर खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. याचा पुरावा म्हणजे तिचे इंस्टाग्राम अकाउंट, जिथे ती अनेकदा तिच्या हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी ईशाने तिचा बोल्ड फोटो पोस्ट केला होता, जो सोशल मीडियावर आगीसारखा पसरला होता. याशिवाय ती बिकिनीमध्येही तिचे फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ईशा गुप्ता शेवटची ‘वन डे: जस्टिस डिलिव्हर्ड’ या चित्रपटात दिसली होती. आता ती ‘देसी मॅजिक’ आणि ‘हेरा फेरी ३’ सारख्या चित्रपटांचा भाग असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा