फरहान अख्तर पुन्हा लिहिणार नवा इतिहास? घेतलीय ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमापेक्षाही जास्त मेहनत


सध्या बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा त्याचा आगामी ‘तूफान’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटात एका बॉक्सरची कहाणी दाखवली आहे. या चित्रपटात फरहानने खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटातील एक बीटीएस व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये फरहान अख्तर जबरदस्त मेहनत घेताना दिसत आहे.

हा व्हिडिओ वूम्पलाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये फरहान बॉक्सिंग करताना दिसत आहे. त्याचे ट्रेनर त्याला काही गोष्टी शिकवताना दिसत आहेत. तसेच या चित्रपटाचे निर्माते तसेच ट्रेनर सांगत आहेत की, फरहानने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. (Farhan Akhtar’s toofaan movies BTS video viral on social media)

या आधी फरहानने ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातही अशीच मेहनत घेतली होती. तूफान चित्रपटात तो ‘भाग मिल्खा भाग’ पेक्षाही जास्त मेहनत घेताना दिसत आहे.

‘तूफान’ हा चित्रपट 16 जुलै, 2021 रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. डोंगरी भागातील अजीज अली उर्फ अज्जू भाई नावाच्या एका गुंडाची खेळावरील प्रेरणादायी कहाणी दाखवली आहे. ही कहाणी अजीज अलीच्या बॉक्सिंगवर आधारित आहे. ज्याला आधी बॉक्सिंगमधून पाच वर्षासाठी बाहेर काढलेले असते. पण त्यानंतर तो पुन्हा कसा तयारी करून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरतो हे या चित्रपटात दाखवले आहे.

दक्षिण मुंबई येथे चित्रीकरण झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओम प्रसाद मेहरा यांनी केले आहे. या चित्रपटाची पटकथा अंजुम राजाबालो आणि विजय मौर्य यांनी लिहिली आहे. फरहान अख्तरने या चित्रपटातील हे पात्र निभावताना केलेल्या मदतीचे श्रेय सह कलाकार हुसेन दलालला दिले आहे, जो नागपाडामध्येच राहतो. तसेच त्याने तेथील रहिवासींचे देखील आभार मानले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.