Sunday, July 14, 2024

धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांना धनुषच्या वडिलांनी झुगारून, त्यांच्या वेगळे होण्याचे सांगितले कारण

दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्याने त्यांच्या लग्नाच्या १८ वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. लग्नाच्या एवढ्या वर्षांनी त्यांच्या या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का तर बसला मात्र सोबतच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला असावा याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटस्फोटामागे असलेले खरे कारण धनुष किंवा ऐश्वर्याकडून सांगण्यात आले नसले तरी धनुषच्या वडिलांनी निर्माते कस्तुरी राजा यांनी या घटस्फोटावर भाष्य केले आहे.

या घटस्फोटामागे काहींनी धनुषचे अफेयर असल्यामुळे त्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे, तर काहींनी धनुष आणि ऐश्वर्याचे भांडणं होत असल्यामुळे ते वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र धनुषच्या वडिलांनी या दोघांच्या घटस्फोटासाठी घरगुती भांडणं असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सर्व बातम्यांना झुगारून एका मुलाखतीमध्ये धनुष आणि ऐश्वर्या घटस्फोट घेत नसल्याचे सांगितले आहे.

कस्तुरी राजा यांनी पुढं सांगितले की, “धनुष आणि ऐश्वर्या यांचे वेगळे होण्याचे कारण फक्त असहमती आहे. जसे प्रत्येक वैवाहिक आयुष्यात प्रत्येक जोड्याच्या जीवनात भांडणं होतात तसेच हे एक घरगुती भांडण आहे. याचाच अर्थ असा नाही की त्यांनी घटस्फोट घेतला.” सध्या धनुष आणि ऐश्वर्या चेन्नईमध्ये नसून ते हैद्राबादमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. धनुष आणि ऐश्वर्या यांनी २००४ मध्ये लग्न केले. ऐश्वर्या रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्या यांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुलं आहेत. दोघांनी सोशल मीडियावर जॉईंट स्टेटमेंट शेअर करत ते दोघं वेगळे होत असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा