Sunday, July 14, 2024

शाहरुखच्या मन्नतवर सलमान, अक्षय कुमारसह दिग्गज कलाकारांची मांदियाळी ‘हे’ होते विशेष कारण

हिंदी चित्रपट जगतात शाहरुख खान(Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar)  याच अभिनेत्यांचा सर्वात जास्त बोलबाला पाहायला मिळतो. अनेकदा ही स्टार मंडळी एकत्र आलेली पाहायला मिळतात. फक्त भारतातच नव्हेतर शाहरुख आणि सलमान खानचे बाहेरील देशांमध्येही अनेक दिग्ग्ज चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर सलमान खान आणि अक्षय कुमारने हजेरी लावल्याचे दिसत आहे. त्यांच्यासोबत सौदी अरेबियाचे मंत्रीही भेटायला आल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे हे संपुर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

अलीकडेच शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यात हिंदी चित्रपट जगतातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींचा मेळा दिसला. सैफ अली खान, अक्षय कुमार, सलमान खानपासून ते सर्व सेलिब्रिटींनी शाहरुख खानच्या घरी हजेरी लावली होती. आता तुम्ही विचार करत असाल की बॉलीवूडचा टॉपचा सुपरस्टार शाहरुखच्या घरी असे काय झाले की ज्यामुळे सगळ्या कलाकारांनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. तर या भेटीचे खास कारण म्हणजे सौदी अरेबियाच्या रेड सी फिल्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष मोहम्मद अल तुर्की आणि अनेक पाहुणे भारतात आले होते आणि त्यांचे स्वागत शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर करण्यात आले होते. या भेटीमुळे सलमान खान आणि अक्षय कुमारही शाहरुख खानच्या घरी पोहोचले होते.

सांस्कृतिक मंत्री आणि अल-उलासच्या रॉयल कमिशनचे गव्हर्नर बदर बिन फरहान अलसौद यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान आणि अक्षय कुमारला भेटताना दिसत आहेत. एका छायाचित्रात अक्षय कुमार आणि सलमान खान एकत्र दिसत आहेत. हे फोटो पोस्ट करत त्यांनी “बॉलिवुड सुपरस्टार्स सैफ, शाहरुख, अक्षय आणि सलमान खान यांना भेटलो. चित्रपट जगताबद्दल बोलण्याची आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळाली,” असा कॅप्शन दिला आहे. सध्या हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

https://www.instagram.com/moalturki/?utm_source=ig_embed&ig_rid=9d377d4e-c20d-42e9-8fe8-b0262d966273

दरम्यान, अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच शाहरुख खान पठाणच्या शूटिंगचे स्पेन शेड्यूल पूर्ण करून भारतात परतला आहे. स्पेननंतर तो दुबईच्या मॉलमध्येही दिसला. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने स्पेनमध्ये पठाणचे शूट केले. सिद्धार्थ आनंद पठाणचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पठाण चित्रपट पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘छैया छैया’ गाणे ठरले होते मलायकाच्या करिअरसाठी मैलाचा दगड, पण या अभिनेत्री होत्या पहिली चॉइस

ऐश्वर्याच्या धमाकेदार गाण्यावर केला अभिषेकने भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

डान्स परफॉर्मन्समध्ये सपना चौधरीला का घालावा लागतो ड्रेस? देसी क्वीनने स्वतः खुलासा केला

हे देखील वाचा