परी करतीये ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचा अभिनय, ओळखा पाहू कोण आहे तो?


झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ‘ या मालिकेतील सगळेच कलाकार अव्वल कलाकार आहेत. मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत आहेत. दोन नावाजलेले कलाकार आहेत म्हणजे मालिका हिट होणारा यात सुरुवातीपासूनच काही वाद नव्हता. परंतु मालिकेत आणखी एक अशी कलाकार आहे, जिने प्रोमोपासून सगळ्यांच्या मनावर राज्य केले. ती म्हणजे मायरा वैकुळ. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मायरा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील एका कलाकाराचा अभिनय करत आहे. ती मालिकेतील समीरचा अभिनय करताना दिसत आहे. ती म्हणते की, “जग्गू मैंने कब से बोला था, मी कब से बोल रहा हू.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Myra vaikul’s video viral on social media)

तिच्या या व्हिडिओवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. मायराचे सगळेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिने सोशल मीडियावर तिचा असा एक खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत एक स्त्री तिच्या पतीशिवाय तिच्या लहान मुलीला कशाप्रकारे वाढवते, हे दाखवले आहे. यात तिला मानसिक तसेच अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागते, तरी देखील ती एकटी तिच्या मुलीला जॉब करून खूप प्रेमाने वाढवते. अचानक त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती येते आणि त्यांचे आयुष्य बदलून टाकते. या लहान मुलीला आणि तिच्या आईला जगण्याचा एक आधार देते ही अत्यंत भावनिक आणि सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे.

हेही वाचा :

ख्रिसमस पार्टीत पोहोचताच मलायका अरोराला तिच्या हाय हिल्सने दिला धोका, अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था

घटस्फोटानंतर समंथा-नागा चैतन्य आले समोरासमोर, एकमेकांपासून नजर चोरत निघून जाणे केले पसंत

अभिनेता विवियन डिसेनाने आणि वाहबिज दोराबजी यांचा घटस्फोट, परस्पर संमतीने संपवले अनेक वर्षांचे नाते

 


Latest Post

error: Content is protected !!