पगडी हीच ओळख असणाऱ्या हर्षदिपला कौरला अमिताभ बच्चन यांनी दिली ‘सुफी की सुलताना’ ही पदवी


बॉलिवूडमध्ये अनेक नामचीन गायक आणि गायिका आहेत. या सर्वांनी त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. असे असूनही एक गायिका या सर्वांपेक्षा वेगळी आणि हटके ठरली. ती गायिका म्हणजे हर्षदीप कौर. आपल्या सुफी गाण्यांनी आणि थेट मनाला भिडणाऱ्या आवाजाने हर्षदिपने बॉलिवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज (१६ डिसेंबर) हर्षदीप कौर तिचा वाढदिवस साजरा करत आहे. हर्षदीप कौरचा १६ डिसेंबर १९८६ रोजी दिल्लीमध्ये शीख कुटुंबात तिचा जन्म झाला.

हर्षदिपला संगीताचा वारसा तिच्या घरातूनच मिळाला. तिच्या वडिलांचा संगीताचे वाद्य बनवण्याचा व्यवसाय होता. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच हर्षदिपने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिने दिल्ली संगीत रंगमंचचे प्रसिद्ध सिंह ब्रदर्स उर्फ श्री तेजपाल सिंह यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. २००१ साली तिने एम टीव्हीच्या एका सिंगिंग शोमध्ये सहभाग घेत हा शो जिंकला. पुढे २००८ साली हर्षदिपने इमॅजीन चॅनेलवरील ‘जूनून-कुछ कर दिखाने का’ या सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये या शोमध्ये भारतासोबतच पाकिस्तानी कलाकारांचा देखील समावेश होता. पुढे हर्षदिपने हा शो जिंकला. या शो दरम्यान बॉलिवूडच्या माहनायक अमिताभ बच्चन यांनी तिच्या सुफी गाण्याच्या सादरीकरणावर भुलून जात हर्षदिपला ‘सुफी की सुलताना’ ही पदवी दिली. दोन रियॅलिटी शो जिंकणारी हर्षदीप ही पहिली गायिका ठरली.

हर्षदिपने २००३ साली आलेल्या ‘आपको पहले भी कभी देखा हैं’ सिनेमातून गाणे गात तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘रंग दे बसंती’ सिनेमातील ‘एक ओंकार’, ‘टॅक्सी नंबर ९२११’ मधील ‘उड़ने दो’, ‘बँड बाजा बारात’चे ‘वारी बरसी’, ‘देसी ब्वॉयज’ मधील ‘झक मार के’, ‘रॉकस्टार’ मधील ‘कतिया करूं’, ‘कॉकटेल’चे ‘जुगनी’, ‘जब तक है जान’मधील ‘हीर’, ‘राजी’ मधील ‘दिलबरो’, ‘मनमर्ज‍ियां’तील ‘चोंच लड़ाईयां’, ‘पंगा’चे ‘ले पंगा’ आदी अनेक गाणी गायली. तिला तिच्या गाण्यांमुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

हर्षदिपचे नाव उच्चरताच तिचा सर्वात आधी डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे सुफी वेशभूषा आणि त्यावर असणारी आकर्षक पगडी. हर्षदीप पगडी घालण्यामागे देखील एक किस्सा आहे. एका रियॅलिटी शो दरम्यान तिला सुफी गाणे गाताना डोक्यावर दुपट्टा घेतला होता. मात्र त्यानंतर तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला पगडी घालण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हर्षदीप नेहमीच पगडीमध्ये दिसली.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!