मराठी टेलिव्हिजनवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेच्या कथेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिकेत राणादा आणि पाठक बाईंची रंजक अशी लवस्टोरी दाखवण्यात आली होती. ज्यामधील दोघांच्या केमिस्ट्रीचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले होते. मालिकेत राणाच्या भूमिकेत हार्दिक जोशीने साकाली होती. तर अंजली म्हणजेच पाठक बाईंच्या भूमिकेत अक्षया देवधर झळकली होती. या जोडील लोकांनी खूप सारे प्रेम दिले. पडद्यावर दिसणाऱ्या या जोडीने खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांची चांगली साथ दिला आहे.
काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी लग्न केले आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याचे चाहते ही बातमी ऐकून चाहते खूप आनंदी झाले होते. ते दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. नुकताच हार्दिकने (Hardik Joshi) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच धूमाकूळ घालत आहे.
या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि अक्षया जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेताना दिसत आहेत. यानंतर तो अक्षयाला पाच पावलं उचलून घेऊन जेजुरी गड चढताना व्हिडिओत दिसत आहेत. यामुळे त्याने जेजुरीची परंपरा जपलीअसल्याचे दिसत आहे. इतकचं नाही तर त्याने 42किलोची तलवार उचलली आहे. तसेच दोघांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत भंडाराही उधळला आहे. त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करताना हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिले की, “येळकोट येळकोट जय मल्हार…” त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. कमेंट करत काही चाहत्यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, असे लिहिले आहे. तर काहींनी लिहिले की, ‘आमच्या आवडती जोडी.’ त्याचा हा व्हिडिओ काही तासांत खूप व्हायरल झाला आहे. (Hardik Joshi and Akshaya Deodhar’s video from Jejuri went viral on social media)
अधिक वाचा-
–बोल्डनेसची सीमा पार! निक्की तांबोळीचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम
–उर्फी जावेदच्या ‘त्या’ वक्तव्यावर नेटकरी संतापले; म्हणाले, ‘देशाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार तुला नाही’