Friday, March 31, 2023

हॉलिवूडचा सुपरस्टारही आहे शाहरुख खानचा जबरा फॅन; ‘किंग खान’ची प्रशंसा करताच त्यानेही दिली प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खानचे चाहते आज भारतात नव्हे, तर संपूर्ण जगात पसरले आहेत. त्याच्या अभिनयाची आज संपूर्ण दुनिया दीवानी आहे. याचप्रमाणे हॉलिवूड सुपरस्टार टॉम हिडलस्टन देखील शाहरुख खानचा जबरा फॅन आहे. त्याने शाहरुखची प्रशंसाही केली आहे. याचा प्रत्यय मागील काही दिवसात टॉमच्या एका व्हिडिओवरून आला आहे.

शाहरुख खानने टॉमचे ट्वीट रीट्विट केले आहे. त्याने लिहिले आहे की, “तुम्ही खूप दयाळू आहात. खोडकरपणाचे देव. अशी आशा करतो की, या वक्तव्यामागे कोणता खोडकरपणा नसेल. खूप सारे प्रेम टॉम. ‘लोकी’साठी वाट पाहत आहे. आता पहिला एपिसोड सुरू करत आहे.”

टॉम हिडलस्टनच्या व्हिडिओमध्ये तो ‘वर्ल्ड असोसिएशन’ गेम खेळताना दिसत आहे. या खेळाची सुरुवात ‘लोकी’ या शब्दापासून होते. यावर अभिनेता म्हणतो की, “मी.” यांनतर त्याला दुसरा शब्द ‘थॉर’ आणि ‘क्रिस’ दिला जातो. यावर अभिनेता म्हणतो की, “ब्रदर आणि हेम्सवर्थ.” पुढे टॉमला ‘इंडियन सिटी’ या शब्द दिला जातो. यावर तो म्हणतो की, “चेन्नई सिटी.” यांनतर तो म्हणतो की, “चेन्नई खूपच सुंदर शहर आहे. मी तिथे काही काळ राहिलो आहे.” शेवटी त्याला शब्द दिला जातो की, ‘इंडिया’ आणि ‘बॉलिवूड’ यावर तो उत्तर देतो की, “शाहरुख खान.”

खरंतर ही टॉमने भारताचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्याने याआधीही सांगितले होते की, त्याला ही जागा खूप आवडते आणि शाहरुख खानचा ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट खूप आवडतो. मार्व्हलची वेबसीरिज ‘लोकी’ डिझनी हॉटस्टारवर 9 जूनला प्रदर्शित झाली आहे. टॉम हा मार्व्हल कॉमिक्सच्या लोकी या पात्रासाठी लोकप्रिय आहे.

शाहरुख खान हा बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेता आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘दिलवाले’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘बाजीगर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘झिरो’, ‘रावण’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

हे देखील वाचा