आपल्याच गाण्यावर थिरकली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस; व्हिडिओला एकाच तासात मिळाले ३ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज


बॉलिवूडमधील हॉट आणि नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिन ही इंडस्ट्रीमधील एक व्यस्त अभिनेत्री आहे. कधी चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या म्युझिक व्हिडिओमुळे ती प्रेक्षकांचे चर्चेत असते. नुकतेच जॅकलिनचे बादशाहसोबतचे ‘पाणी पाणी’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. अभिनेत्रीने याच गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. तसेच हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. जॅकलिनचे चाहते या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

जॅकलिनने हा डान्स व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचे कमालीचे डान्स मुव्ह्स पाहायला मिळत आहेत. जॅकलिनने शेअर केलेल्या या डान्स व्हिडिओमध्ये तिचे आवडते कोरिओग्राफर देखील दिसत आहे. याची माहिती तिने तिच्या कॅप्शनमध्ये दिली आहे. तिच्या या व्हिडिओची खासियात ही आहे की, केवळ एक तासात या व्हिडिओला ३ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एकूण व्ह्यूजबद्दल बोलायचं झालं, तर तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत २१ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोविंग असल्याने तिच्या या व्हिडिओला खूप प्रेम मिळत आहे. तसेच तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. जॅकलिनचे सोशल मीडियावर 52 मिलियन एवढे फॅन फॉलोविंग आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘जुडवा 2’, ‘किक’, ‘रेस 3’, ‘हाऊसफुल 3’, ‘डिशुम’, ‘अ फ्लाईंग जॅट’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबत ती लवकरच ‘किक 2’, ‘भूत पोलीस’, ‘सर्कस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.