अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या नवीन चित्रपट वेदामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे. शर्वरी आणि अभिषेक बॅनर्जी यांनीही या चित्रपटात काम केले आहे. जॉनच्या चाहत्यांना आशा आहे की, ‘पठाण’प्रमाणेच त्याचा चित्रपटही चांगली कमाई करेल. अलीकडेच जॉनने पठाण या चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
आदित्य चोप्रा त्याचे चित्रपट फक्त शाहरुख खानलाच दाखवतो. त्यांच्याशिवाय तो कोणालाही दाखवत नाही. असाच काहीसा प्रकार ‘पठाण’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी घडला होता. जॉन अब्राहमने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हे सांगितले. त्याने सांगितले की आदित्य चोप्रा खूप कडक आहे. शाहरुख खाननेच चित्रपटाशी संबंधित माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवली.
शाहरुख खानसोबतच्या नात्याबाबत जॉन अब्राहम म्हणाला की, “पठाण चित्रपटात काम करताना दोघांमध्ये खूप आदर आणि प्रेम होते. जॉनने शाहरुखला एक बुद्धिमान व्यक्ती असेही म्हटले आहे.” तसेच त्याचे कौतुक करताना तो म्हणाला की तो एक व्यक्ती आहे जी इतरांची काळजी घेते.
‘पठाण’मध्ये काम करण्यापूर्वीही जॉन अब्राहमने दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्रासोबत काम केले होते. या दोघांनी 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘धूम’ चित्रपटात एकत्र काम केले होते. जॉनने आदित्यबद्दल आपले मत आत्मविश्वासाने व्यक्त केले आणि म्हणाला की मला माहित आहे की मी जेव्हाही आदित्य चोप्रासोबत चित्रपट करेन तेव्हा तो चांगला होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन ! बॉलीवूडवर शोककळा…
जागतिक पातळीवरच्या पुरस्काराने शाहरुख खान सन्मानित ! ठरला पहिला भारतीय अभिनेता…