संजय लीला भन्साळींच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘हीरामंडी’मध्ये जुही चावलाची एन्ट्री; वेबसीरिजमध्ये असणार इतर १८ अभिनेत्री

चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटसृष्टीत २५ वर्षे पूर्ण केली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या ‘हीरामंडी’ या ड्रीम प्रोजेक्टची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यावर काम देखील सुरू केले आहे. संजय याला वेब सीरिजच्या स्वरुपात बनवणार आहेत. यासाठी त्यांनी नेटफ्लिक्ससोबत करार केला आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, निम्रत कौर आणि मनीषा कोयराला यांच्यासह अनेक अभिनेत्री असणार आहेत. आता जुही चावला देखील या चित्रपटात सामील होणार आहे.

प्रोजेक्टवर काम करणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, “हिरामंडीमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोयराला, निम्रत कौर, संजीदा शेख आणि डायना पेंटीसह एकूण १८ अभिनेत्री दिसणार आहेत. आता जुही चावला देखील चित्रपटात सामील होणार असल्याचे वृत्त आहे. या ८ एपिसोडच्या वेब सीरिजमध्ये ती एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जुही चावला संजय लीला भन्साळींना भेटली आणि लगेचच पात्र साकारण्यास तयार झाली. ती लवकरच तिचे शूटिंग सुरू करणार आहे.” (bollywood leela bhansali web series heeramandi juhi chawla joins)

View this post on Instagram

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

या सूत्राने पुढे असा खुलासा केला की, ही वेब सीरिज भारताच्या फाळणीपूर्वीची कथा आहे आणि भन्साळींनी त्यात काही बदल केले आहेत. स्रोत म्हणाला, “मूळ हीरामंडी लाहोरमध्ये होती आणि पूर्वी शाही मोहल्ला म्हणून ओळखली जात होती. तिथे दरबाऱ्यांनी जागेवर ताबा घेण्यास सुरुवात केली आणि मग येथे मुजरा सुरु झाला. मुघल साम्राज्याचे कामगार आणि नोकर येथे राहत होते.”

सूत्र पुढे म्हणाले की, “भन्साळींनी संगीत आणि डान्स शिकण्यासाठी हीरामंडीला पवित्र स्थान म्हणून दाखवण्याची योजना आखली आहे. ही वेब सीरिज गीत- संगीताच्या दोन घरांतील संघर्षावर केंद्रित होईल. ही कथा लाहोरहून मुंबईला जाते.” महत्त्वाचे म्हणजे, याचा पहिला आणि शेवटचा भाग संजय लीला भन्साळी स्वतः दिग्दर्शित करणार आहेत. तर, इतर भाग विभू पुरी आणि मिताक्षरा कुमार दिग्दर्शित करतील. या दोघांनी संजय लीला भन्साळींना अनेक चित्रपटांमध्ये सहाय्य केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

Latest Post