×

‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कंगना आहे व्यस्त, दिग्दर्शकाने फोटो शेअर करून दिले ‘हे’ खास कॅप्शन

हिंदी चित्रपट जगतात सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून कंगना रणौतच्या नावाचा उल्लेख केला जातो. कंगना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. अनेक विषयांवर ती आपले मत मांडत असते यामुळे बर्‍याचदा तिला टीकेचा सामनाही करावा लागतो. मात्र सध्या कंगना आपल्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे ज्याची माहिती तिने सोशल मीडिया वरुन आपल्या चाहत्यांना दिली आहे. कंगनाने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो सोशल पोस्ट केला आहे, यामधल्या तिच्या लुकची सर्वत्र चर्चा होत आहे.

आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री अशी कंगना रणौतची( kangana ranaut) ओळख आहे. आपले प्रत्येक चित्रपट ती तिच्या अभिनयाच्या जोरावर लोकप्रिय ठरवत असते. सध्या कंगना तिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगनाचा लुक पाहून चित्रपटातील तिच्या दमदार भूमिकेचा अंदाज येत आहे. आता चाहत्यांना कंगनाच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

तत्पूर्वी हा व्हायरल फोटो चित्रपटाचे दिग्दर्शक रजनीशन घई यांनी सर्वप्रथम सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी कंगनाच कौतुक करताना ”या असामान्य व्यक्तिमत्वासोबत बुडापेस्टमध्ये होत असलेल्या शूटिंगला खूप मिस करतोय, धाकडच्या संपूर्ण टीमकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,” असा संदेश दिला होता. दिग्दर्शकांनी केलेल्या या गोड कौतुकाचा फोटो आपल्या चाहत्यांशी इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Razneesh “RAZY” Ghai (@razylivingtheblues)

या फोटोमध्ये कंगना चित्रपटाच्या दिग्दर्शकांबरोबर कॅमेऱ्यात बघताना दिसत आहे. दोघांमध्ये गंभीर विषयावर चर्चा चालल्याचे या फोटोत दिसत आहे. तिने यावेळी भडक रंगाचे कपडे घातले असून चेहर्‍यावर लागल्याच्या जखमाही दिसत आहेत. आता कंगनाच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

हा चित्रपट एजंट अग्नी नावाच्या एका महिलेवर आधारित आहे. या चित्रपटातून ती पहिल्यांदाच अशा भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून तो ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा :

 

Latest Post