×

“त्याने स्वतःला गाडून घेत समाधी घेतली”, म्हणत राखीने व्यक्त केला बिचकुलेवरचा रोष

राखी सावंत नाव जरी उच्चारले तरी आक्रमकता, अतरंगी, विवादित वक्तव्य, विचित्र वेशभूषा आदी अनेक गोष्टी आठवतात. राखी नेहमीच मीडियासमोर आली की, तिच्या पोषाखामुळे आणि काही वक्तव्यांमुळे लाइमलाइटमध्ये येत असते. बिग बॉस १५ मध्ये देखील राखीने नवा हुरूप आणि नवा जीव आणला होता. मात्र नुकतीच राखी या घरातून बाहेर पडली आहे. राखी घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकदा माध्यमांसमोर येऊन गेली. नुकतेच राखीला पुन्हा एकदा माध्यमांनी आणि पॅपराजीनी घेरले. त्यावेळी राखीने अभिजित बिचकुलेवर एक वक्तव्य केले आहे.

राखी आणि तिचा पती रितेश यांना मीडियाने स्पॉट केल्यानंतर रिपोर्टरने राखीला बिग बॉस स्पर्धक अभिजित बिचकुलेवर प्रश्न केला त्यावर राखीने तिच्या खास अंदाजात आणि तिच्या शैलीत उत्तर देताना सांगितले की, “बिचुकलेने समाधी घेतली. त्याने स्वतःला गाडून घेतले आहे. माझ्या सलमान खानवर जगात कोणीही काहीही बोलेल तर राखी सावंत त्यांची वाट लावेल.” राखीला मीडियाने घेरले तेव्हा ती तिच्या पतीसोबत होती. यावेळी तिचा अवतार देखील पाहण्याजोगा होता. राखीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, त्यावर तिने त्याच रंगाचा आय मेकअप देखील केला होता. सोबतच डोक्यावर देखील तिने काहीतरी वेगळे लावलेले दिसले. याशिवाय जेव्हा राखीला मीडियाने स्पॉट केले तेव्हा ती येत होती, मीडियाला सांगितले “जर मला धक्का लावला तर मी तुमच्यावर २०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकेल.”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तत्पूर्वी अभिजीत बिचकुले बिग बॉस १५ मधून बाहेर पडला आहे. या बिग बॉस १५च्या घरात त्याचा प्रवास खूपच वादग्रस्तच ठरला. बिचुकलेला याच्या वागण्यामुळे बऱ्याचदा सलमान खानने फटकार देखील लगावली होती. सलमान खानच्या कानउघडणीवर बिचुकले संतप्तसुद्धा झाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर त्याने सलमानवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘सलमान खानला त्याच्यापेक्षा दुसरे कोणी मोठे झालेले सहन होत नाही. त्याच्या सारखे १०० जण मी दाराशी उभे करीन आणि माझी गल्ली झाडायला लावीन,’ अशी अनेक वक्तव्य करत बिचुकलेने सलमानवरचा त्याचा रोष व्यक्त केला. यावरूनच मीडियाने राखीला तिचे मत विचारल्यावर राखीने बिचुकलेने समाधी घेतल्याचे सांगितले.

हेही वाचा-

Latest Post