बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणून ओळखली जाणारी कंगना रानौत नेहमीच तिच्या बेबाक व्यक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर बिनधास्तपणे आपले मत मांडणाऱ्या कंगनाला ट्विटरवर बॅन केले आहे. त्यामुळे ती आता मोठ्या प्रमाणात इंस्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. करोडो फॉलोवर्स असणारी कंगना इंडस्ट्रीसोबतच अनेक सामाजिक मुद्द्यावत तिचे परखड मत मांडत असते. कंगनाची प्रत्येक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असते. त्यामुळे नेटकरी आणि मीडिया सतत तिच्याकडे लक्ष ठेऊनच असतात. यावेळी देखील कंगना तिच्या एका वेगळ्याच पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ती पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये एक फोटो खरंतर ते एक स्केच असून तिने ते पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये एक मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या मिठीत दिसत आहे. यासोबतच तिने एक कॅप्शन देखील लिहिले आहे. “तेरे लिये हम हैं जिये…कितने सितम हम पे सनम….” यासोबतच तिने अजून एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो कंगनाची लहानपणीच असून, यासोबत तिने लिहिले, “मी एक साधारण मुलगी आहे. माझ्याबद्दल काही खास नाही, फक्त मी प्रेमाच्या सुंदरतेवर विश्वास ठेवते आणि हेच मला या सुंदर जगातून मिळाले आहे.”
कंगनाची ही पोस्ट पाहून हे तर नक्कीच सिद्ध होते की, पुन्हा एकदा तिचा प्रेमावर विश्वास बसला आहे. सोबतच तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचा प्रवेश देखील झाला आहे. मात्र आता ही स्पेशल व्यक्ती कोण याबद्दल माहिती नसली तरी लवकरच समजेल. कंगनाचे याआधी ऋतिक रोशन, आदित्य पंचोली, अध्ययन सुमन नाव जोडले गेले आहेत. ऋतिक आणि कंगना यांचे प्रकरण मीडियामध्ये तुफान गाजले.
काही दिवसांपूर्वीच कंगनावर पुन्हा एफआयआर नोंदवली गेली आहे. मोदी सरकारने शेतकरी आंदोलन मागे घेतल्यानंतर कंगनाने या शेतकरी आंदोलनाची सुरूवात खलिस्तानी आंदोलनासोबत केली होती. त्यानंतर तिच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली. याची माहिती स्वतः कंगनानेच दिली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा
-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?