Friday, March 29, 2024

‘१५ कोटी का देऊ?’ नवख्या कलाकारांच्या फी वाढीच्या मागणीवर करण जोहरने केले ‘असे’ वक्तव्य, ऐकून त्यांना वाटेल वाईट

बॉलिवूडचा निर्माता करण जोहरसोबत (Karan Johar) काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. मग तो कलाकार सिनेविश्वात आपला ठसा उमटवण्याच्या प्रयत्नात असेल किंवा नव्या पिढीचा असेल. मात्र नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत करण जोहरने तरुण कलाकारांच्या वाढलेल्या फीचा मुद्दा उपस्थित केला. फीच्या वाढत्या मागणीबाबत करण जोहरने असे वक्तव्य केले की, नवीन कलाकार नक्कीच नाराज होऊ शकतात.

कलाकारांनी वाढवली १००% फी
फिल्म कम्पॅनियनमध्ये निर्मात्यांच्या राउंड टेबल कॉन्फरन्स दरम्यान करण जोहरने नव्या कलाकारांच्या फी वाढवण्याच्या मागणीवर आपले मत मांडले. या पत्रकार परिषदेत करण जोहर व्यतिरिक्त रीमा कागती, झोया अख्तर, निखिल अडवाणी आणि समीर नायर देखील उपस्थित होते. यादरम्यान करण जोहर म्हणाला की, “अनेक तरुणांनी त्यांची फी १०० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. काही कलाकारांचे म्हणणे आहे की, त्यांचे चित्रपट चालले नाहीत किंवा प्रदर्शित झाले नाहीत त्यामुळे त्यांनी फी वाढवली आहे.” (karan johar angry on new generation actors demanding fee)

करण जोहर म्हणाला की, “चित्रपटसृष्टी नफा कमावण्याच्या प्रयत्नात असताना हे सर्व घडत आहे. परिस्थिती अशी होती की चित्रपटांचे शूटिंग आणि चित्रपटांचे प्रदर्शनही थांबवावे लागले.” तिथे उपस्थित सर्व सिनेकलाकारांनी करण जोहरच्या या बोलण्याशी सहमती दर्शवली. यानंतर करण जोहर म्हणाला की, “तंत्रज्ञ आणि लेखकांना त्यांच्यापेक्षा खूपच कमी पैसे मिळतात, तरीही त्यांची मागणी संपत नाही.”

‘कलाकाराला १५ कोटी का देऊ?’
सर्व निर्मात्यांनी करण जोहरशी सहमती दर्शवली की हे तर्क सुप्रसिद्ध कलाकारांसाठी कार्य करते, परंतु ज्या तरुण कलाकारांनी या कामात पाऊलही ठेवले नाही त्यांच्यासाठी हे खूप बालिश आहे. करण म्हणाला, “चित्रपटाला खऱ्या अर्थाने स्पेशल बनवणाऱ्या टेक्निकल क्रूला पैसे दिले तर बरे होईल. मी एका अभिनेत्याला १५ कोटी आणि संपादकाला ५५ लाख का देऊ?”

महत्वाचे म्हणजे, आता करण जोहरचे हे विधान ऐकून नवोदित कलाकारांना वाईट वाटणार हे नक्कीच!

हेही वाचा :

हे देखील वाचा