×

जेव्हा भरस्टेजवर करणने सलमानसमोर घेतलं ऐश्वर्याचं नाव, ‘अशी’ दिली अभिनेत्याने प्रतिक्रिया

सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्याचा समावेश बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय प्रेमकथेमध्ये होतो. पण दोघांना या नात्यात यश मिळू शकले नाही. हे प्रेमप्रकरण इतकं गाजलं की, त्यांच्या नात्याची आणि ब्रेकअपची चर्चा आजही होत असते.

ऐश्वर्या राय बच्चन हिने अभिषेक बच्चनशी (Abhishek Bachchan) लग्न केले असले, तरी सलमान खानने आजपर्यंत कोणाशीही लग्न केलेले नाही. पण जेव्हा त्यांच्यासमोर एकमेकांच्या नावाचा उल्लेख होतो, तेव्हा दोघांनाही अस्वस्थ वाटू लागते. असेच काहीसे सलमान खानच्या बाबतीत घडले होते. सध्या एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्टार गिल्ड अवॉर्ड्स दरम्यानचा आहे. यामध्ये स्टेजवर उपस्थित करण जोहर (Karan Johar) आणि सलमान खान सेलिब्रिटींचे मनोरंजन करत आहेत. (karan johar took aishwarya rai bachchan name infront of salman khan actor reacted)

स्टेजवर, सलमान खान करण जोहरसोबत रॅपिड फायर राउंड खेळत असतो, जसे करण जोहर त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये खेळतो. अनेक वेगवान प्रश्नांनंतर, सलमान खान करण जोहरला विचारतो, “जर तुला मुलगी होण्याचे वरदान मिळाले, तर तुला कोणती नायिका व्हायला आवडेल?” यावर करणचे उत्तर ऐकून सलमान खान काही क्षणांसाठी शांत होतो. करण जोहर म्हणाला की, “मला ऐश्वर्या राय व्हायला आवडेल.” हे ऐकून सलमान गप्प राहिला आणि हसून म्हणाला, “ऐश्वर्या राय बच्चन? कारण?” करण जोहर पुढे म्हणाला, “कारण विचारतोय तू?तू विचारतोय कारण?”

सलमान खान पुन्हा गप्प झाला आणि हसत म्हणाला, “हो, मी विचारतोय.” यानंतर करण जोहर म्हणाला, “ती फक्त भारतातीलच नाही, तर ती जगातील सर्वात सुंदर महिला आहे, ती ऐश्वर्या राय आहे.” करण जोहरच्या उत्तरावर सलमान खानने प्रतिक्रिया दिली की, “ऐश्वर्या राय सर्वात सुंदर आहे, हे तर बरोबरंय!”

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या राय शेवटची २०१८ म्युझिकल फिल्म ‘फन्ने खान’मध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि राजकुमार रावसोबत (Rajkumarr Rao) दिसली होती. अभिनेत्री ती लवकरच मणिरत्नमच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहे. तर सलमान खान अखेरचा ‘अंतिम’मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post