‘बुटा बोम्मा’ गाण्यावर कार्तिक आर्यनने केला डोळ्यांचं पारणं फेडणारा डान्स, चाहत्यांनीही बांधले कौतुकाचे पूल


बॉलिवूडमधील सर्वात देखणा आणि स्मार्ट अभिनेता अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन. सोशल मीडिया आणि कार्तिकचा खूप जवळचा संबंध आहे. त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तो सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. कार्तिकचे इंस्टाग्रामवर 21.5 एवढे फॉलोवर्स आहेत. सध्या कार्तिकचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या एक डान्स व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने जबरदस्त डान्स स्टेप्स केल्या आहेत. या व्हिडिओला एका तासातच नऊ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हा डान्स व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले आहे की, “डान्स लाईक…(लिहू नको कोणीच बघत नाहीये.)” यावर युजरने कमेंट करून लिहिले आहे की, ते त्याचा शानदार डान्स व्हिडिओ बघत आहेत. त्याचा हा डान्स पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, “हे टॅलेंट आतापर्यंत कुठे लपून ठेवले होते.” यासोबत एकाने ‘कडक’ असे लिहून त्याच्या डान्सचे कौतुक केले आहे.

या डान्स व्हिडिओमध्ये कार्तिकसोबत कोरिओग्राफर साजिया समजी आणि पीयूष भगत डान्स करताना दिसत आहेत. पीयूषने लिहिले आहे की, “वाह भावा तुझ्यासोबत डान्स करताना खूपच मज्जा आली.”

कार्तिकने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका छुप्पी’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो लवकरच त्याच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी ही देखील असणार आहे. यासोबतच तो ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

-उर्वशीच्या पोटात एका व्यक्तीने दणादण मारल्या बुक्क्या; त्रास होत असूनही अभिनेत्रीने गपगुमान केले सहन

-जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…


Leave A Reply

Your email address will not be published.