Friday, April 19, 2024

लता दीदींच्या आठवणीत भावूक झाले पंतप्रधान मोदी, अयोध्येतील चौकाला दिले गानकोकिळेचे नाव

दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची बुधवारी (दि. 28 स्पटेंबर) 93वी जंयती साजरी करण्यात आली. या विशेष दिनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लता दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अयाेध्येमध्ये एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आलं हाेतं. नरेंद्र माेदी व्हर्च्युअली या कार्यक्रमाशी जोडले गेले होते. यादरम्यान त्यांनी एका चौकाचे उद्घाटन केले.

हा चाैक लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने ओळखला जाईल. यावेळी मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ, केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डीसह अनेक मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रमादरम्यान दिवंगत गायिका यांची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र माेदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले, “लता जी, माता सरस्वतीच्या अशाच एक साधिका होत्या, ज्यांनी आपल्या दिव्य स्वरांनी संपूर्ण जगाला थक्क केले. अयाेध्यामध्ये लता मंगेशकर चाैकात स्थापन केलेली माॅं सरस्वती यांची विणा संगीत ध्यानाचे प्रतीक बनेल.”

मोदी पुढे म्हणाले, “लता दीदींच्या नावाने असलेला हा चौक आपल्या देशातील कलाविश्वाशी निगडित लोकांसाठी प्रेरणास्थान म्हणूनही काम करेल. भारताच्या मुळाशी जोडून राहून, आधुनिकतेकडे वाटचाल केल्याचे ते सांगेल. भारताची कला आणि संस्कृतीला जगाच्या कानाकोपऱ्यात नेणे हे आपले कर्तव्य आहे.”  माेदी पुढे म्हणाले, “लतादीदींसोबत माझ्या खूप आठवणी आहेत. कितीतरी भावनिक आणि गोड आठवणी आहेत. प्रत्येक वेळी मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांच्या आवाजातील गोडपणाने मला मंत्रमुग्ध केले. दीदी मला अनेकदा सांगायच्या की, माणूस वयाने नाही, तर कर्माने माेठा हाेताे.”

लता दीदींसोबत झालेल्या बातचीतची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचे भूमीपूजन झाले, तेव्हा मला लतादीदींचा फोन आला. त्या खूप आनंदात होत्या. त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता की,  शेवटी राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होत आहे. आज मला लतादीदींनी गायलेले ते भजनही आठवत आहे, ‘मन की अयोध्या तक सुनी, जब तक राम नहीं आएगा.’ श्री राम अयोध्येच्या भव्य मंदिरात येणार आहेत आणि त्याआधी करोडो लोकांमध्ये रामाचे नाव पूज्य करणार्‍या लतादीदींचे नाव अयोध्या नगरीसाेबत कायमचे प्रस्थापित झाले आहे.”

हेही वाचा- कशी नशिबाने थट्टा आज मांडली! लेक पलकमुळे कंगाल झाली श्वेता तिवारी, व्हिडिओतून झाला खुलासा

लता मंगेशकर यांनी गायिलेली सर्वच गाणी सुपरहिट झाली आहेत. त्यांच्या गायिकीचा आणि मेहनतीचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके, राजीव गांधी पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळाले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जीतेंद्र यांची पत्नी अन् लेक जाणार खडी फोडायला? बिहारच्या न्यायालयाने बजावले अटक वॉरंट
मानलं पाहिजे राव! पाय फ्रॅक्चर होऊनही शिल्पा गरबा काय सोडायची नाय, जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा