‘प्राजू’चा ग्लॅमरस व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांना पाहायला मिळाल्या अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा


अभिनेत्री केतकी माटेगावकरने तिच्या गोंडस स्मित आणि उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना चकित करून सोडले. ‘टाईमपास’ मधली तिची ‘प्राजक्ता’ची भूमिका प्रचंड गाजली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर ती ‘प्राजू’ म्हणूनच ओळखली जायची. चित्रपटातील साधी प्राजू खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आहे. हे आपण तिच्या फोटो व्हिडिओद्वारे सहज पाहू शकतो.

नुकताच केतकीने शेअर केलेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्येही केतकीच्या चेहऱ्यावर निरागसता पाहायला मिळत आहे. फोटोत तिने लाल रंगाचा प्रिंटेड क्रॉप टॉप व त्याच्यासह त्याच रंगाचे स्कर्ट परिधान केले आहे. शिवाय यात ती तिने घातलेले दागिने फ्लाँट करताना दिसली आहे.

‘टाईमपास २’ मधील सून्या सून्या गाण्यावरील केतकीच्या अदा चाहत्यांकडून चांगल्याच पसंत केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी तिने याच लूकमधील तिचा फोटो शेअर केला होता. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अनेक युजर्सने यावर कमेंट्स करून प्रतिक्रिया दिल्या होत्या.

केतकीने २०१२ साली ‘शाळा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने बऱ्याच मराठी चित्रपटात भूमिका साकारून आपले नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटांच्या यादीत ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका बिली ईलिशला आशियायी लोकांची खिल्ली उडवणे पडले महागात; पोस्ट शेअर करत मागावी लागली माफी

-जेव्हा बिग बींनी नाईलाजाने बांधली होती शर्टाची गाठ; फॅशन समजून चाहत्यांनीही केली नक्कल, आता सांगितला किस्सा

-‘पाऊस, निसर्ग आणि मी…’, म्हणत चिखलात चालताना दिसली मराठमोळी प्राजक्ता माळी


Leave A Reply

Your email address will not be published.