मनवेधक, सोज्वळ अन् सालस व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री केतकी माटेगावकरचे बोल्ड आणि ग्ल‌ॅमरस फोटोज

मनवेधक, सोज्वळ अन् सालस व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री केतकी माटेगावकरचे बोल्ड आणि ग्ल‌ॅमरस फोटोज


‘सा-रे-ग-म-प’ लिटिल चॅम्प्समधील स्पर्धक आणि अनेक प्रसिद्ध चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजेच केतकी माटेगावकर.

पडद्यावर सोज्वळ आणि सालस व्यक्तीरेखा साकारणारी केतकी प्रत्यक्षात मात्र अत्यंत बोल्ड आहे. नुकतेच तिने एक झक्कास फोटोशूट केले असून त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

केतकीने तिच्या अभिनयाने, गायनाने आणि त्यासोबत तिच्या अप्सरी सौंदर्याने अनेकांच्या मनावर नाव कोरले आहे. त्यामुळेच केतकीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

तिचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. केतकीचा हा नवा अंदाज चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे.

केतकीने तानी, टाईमपास, टाईमपास 2, फुंतरु, काकस्पर्श अशा अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो चांगल्या क‌ॅप्शनसह किंवा काहीवेळा फॅन्ससोबत शेयर करत असते.

अभिनय, गायन यांच्यासोबतच सौंदर्याच्या जोरावर आज केतकीने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग असल्याचे पाहायला मिळतो.

केतकीची आई सुवर्णा माटेगावकर प्रसिद्ध गायिका, तर वडील उत्तम हर्मोनियम वादक आहेत. ‘अवघा रंग एकचि झाला’ या नाटकात केतकीने महत्वाची भूमिका साकारली आहे.

केतकी माटगावकरने संगीत दिग्दर्शन म्हणून ‘हरिदर्शनाची ओढ’ या अभंगाला चाल दिली असून, सुरेश वाडकर यांनी तो अभंग गायला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.