दिशा पटानी अन् कियारा आडवाणीने सोबतच सुरु केले होते करिअर; मात्र आज त्यातली एक आहे दुसरीपेक्षा पुढे


मनोरंजन सृष्टीमध्ये आपण पाहिले तर अनेकदा दोन अभिनेत्रींमध्ये तुलना होते. ही तुलना अनेकदा सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून केली जाते तर कधी मीडियाकडून केली जाते. दोन समकालीन अभिनेत्रींमध्ये त्यांच्या करिअरवरून, त्यांच्या चित्रपटांवरून, कमाई, लोकप्रियता, फॉलोवर्स आदी अनेक गोष्टींवरून ती तुलना केली जाते. जर दोन अभिनेत्रींनी एकाच वर्षी पदार्पण केले असेल तरीही त्यांच्यात तुलना होते आणि जर एकाच सिनेमातून पदार्पण केले असेल तर तुलना होतेच होते.

सध्या बी-टाऊनमध्ये दोन अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी एकाच सिनेमातून पदार्पण केले. आज त्या दोघीनी हिट आहेत. तरीही त्यांच्यातली एक अभिनेत्री नक्कीच जास्त यशस्वी समजली जात आहे. या दोन अभिनेत्री आहे कियारा आडवाणी आणि दिशा पटानी. या दोघी सुशांत सिंग राजपूतसोबत २०१६ साली आलेल्या ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात दिसल्या होत्या. महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिक असलेल्या या सिनेमात या दोघीही सोबत झळकल्या होत्या. या सिनेमातून दिशाने अभिनयात पदार्पण केले होते, तर २०१४ साली कियाराने ‘फुगली’ सिनेमातून पदार्पण केले होते. मात्र या दोघींनाही याच सिनेमाने ओळख मिळवून दिली. (kiara advani and disha patani started career together)

दिशाने ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमात महेंद्रसिंग धोनीची प्रेयसी ‘प्रियांका’ची भूमिका साकारली होती. या सिनेमात दिशाची भूमिका लहान मात्र महत्वाची होती. तर कियाराने या चित्रपटात धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर कियारा नेटफ्लिक्सच्या ‘घोस्ट स्टोरी’मध्ये दिसली. २०१८ साली तेलगू सिनेमा ‘भारत अने नेनु’, ‘कबीरसिंग’, ‘गुडन्यूज’ आदी चित्रपटांमधून भूमिका साकारत तिने स्वतःला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. यासोबतच तिचे ओटीटीवर ‘लक्ष्मी’, ‘इंदू की जवानी’ हे सिनेमे प्रदर्शित झाले.

तर दिशाने ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ सारख्या मोठ्या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर ती टायगर श्रॉफसोबत २०१८ साली ‘बाघी २’ मध्ये दिसली. त्यानंतर ती प्रभूदेवा दिग्दर्शित आणि सलमान खान अभिनित ‘राधे’मध्ये झळकली. यासोबतच तिने ‘मलंग’, ‘भारत’, चित्रपटातही काम केले. मात्र तिला पाहिजे तसा फायदा मिळाला नाही. दुसरीकडे कियारा आडवाणी आज सिनेसृष्टीतल्या मोठ्या अभिनेत्रींमध्ये टॉपवर आहे. अनेक स्टार्स किड्सला मागे टाकत ती पुढे आली आहे. येणाऱ्या काळात कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशहा’मध्ये दिसणार आहे. तसेच कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया २’, वरुण धवनसोबत ‘जुग जुग जीयो’ आणि विक्की कौशलसोबत ‘मिस्टर लेले’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कुरूप तुम्ही नाही तर समाज आहे…’; जॅकलिन फर्नांडिसने केवळ टॉवेलने शरीर झाकत दिली फोटोसाठी पोझ

-वाढत्या वयात आईने भेट दिले होते ‘सेक्स एज्युकेशन’चे पुस्तक; इरा खानने सोशल मीडियावर केला खुलासा

-एकेकाळी कापड गिरणीमध्ये करायचा काम, तर आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; वाचा साऊथ इंडस्ट्रीच्या ‘सिंघम’बद्दल


Leave A Reply

Your email address will not be published.