एअरपोर्टवर मास्क काढत कियाराने पटवून दिली तिची ओळख; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘एम एस धोनी’चा तो सीन


नेहमीच सोशल मीडियावर कलाकारांचे विविध व्हिडिओ व्हायरल होताना आपण बघतो. मॉल, मार्केट, सेट, एअरपोर्ट आदी ठिकाणांवर जेव्हा सेलिब्रिटींना पाहिले जाते, तेव्हा तर हमखास त्यांचे व्हिडिओ बनवून व्हायरल केले जातात. असेच जवळपास सर्वच कलाकारांचे व्हिडिओ आपण बघतो. असाच एक व्हिडिओ आजच्या घडीची बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या कियारा आडवाणीचा देखील झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धोनी चित्रपट आठवला.

नुकतेच कियाराला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. यावेळची कियाराचा हा व्हिडिओ एका कारणामुळे चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये कियारा एअरपोर्टवर जीन्स, जॅकेट आणि व्हाइट टीशर्टमध्ये दिसत असून, तिने चेहऱ्याला मास्क लावला आहे. एअरपोर्टवर चेकिंग करताना दिसत असणाऱ्या कियाराला तिची ओळख पटवून घेण्यासाठी CISF अधिकाऱ्याने चेहऱ्यावरील मास्क काढायला लावला. कियाराने त्यांच्या आज्ञेचे पालन करत मास्क काढला, तिची ओळख दाखवली आणि मास्क घालून ती आत निघून गेली. (kiara advani confirm identity at airport)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच हिट ठरत असून, यावर फॅन्सच्या भरपूर कमेंट्स येत आहेत. ‘एम एस धोनी’ सिनेमात कियाराने साक्षी ही भूमिका साकारली होती. क्रिकेटची जास्त आवड नसलेल्या साक्षीने एका हॉटेलमध्ये इंटर्नशिप करत असताना, धोनीला त्याचे नाव आणि आयडी मागितल्याचे दाखवले गेले. आता काही अंशी असाच प्रसंग कियारावर आल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

नेटकरी सांगत आहे की, ‘धोनीनंतर कियारा देखील इमानदारीने काम करत आहे.’ तर काहींनी लिहिले आहे की, ‘तिने ही शिकवण तिच्या चित्रपटातून शिकलेली वाटत आहे’. सध्या कियारा तिच्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत येणाऱ्या ‘शेरशहा’ सिनेमासाठी चांगलीच चर्चेत आली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वाढदिवशी क्रिती सेननने चाहत्यांना केले खुश; एवढ्या धावपळीतही दिली त्यांना सेल्फी

-कारगिल विजय दिन: सैनिकांच्या नावावर अजय देवगणची खास कविता; अक्षयनेही दिली अशी प्रतिक्रिया

-या अभिनेत्यांनी खोटे सिक्स पॅक वापरून केलंय चित्रपटात काम; मात्र प्रेक्षकांना हे समजताच करावा लागला ट्रोलिंगचा सामना


Leave A Reply

Your email address will not be published.