Saturday, April 20, 2024

सारा ते सुहाना, काय झालंय कलाकारांच्या पोरांच शिक्षण? एकदा नजर टाकाच

तैमुर पिझ्झा पार्टी केली, सारा अली खानचा नवा चित्रपट आलाय, जान्हवी कपून तमुक ठिकाणी फिरायला गेलीये. अशा स्टार किड्सच्या अनेक बातम्या आपण जवळपास रोज ऐकतो. स्टार किड्स अर्थात सेलिब्रेटींची मुलं अनेक कारणांमुळे सातत्याने चर्चेत येत असतात.पण कधी या स्टार किड्सचं शिक्षण किती झालंय याचा विचार तुम्ही कधी केलाय का? या व्हिडिओतही आपण हेच जाणून घेऊ की सतत चर्चेत असणारे हे स्टार किड्स शिकलेत तरी किती?

किंग खान अर्थात शाहरुख खान (shahrukh khan) याची मुलंही सातत्याने चर्चेचा विषय ठरतात…त्यातील त्याची दोन्ही मोठी मुलं अर्थात आर्यन खान (aryan khan) आणि सुहाना खान (suhana khan) यांनी वीशी पार केली आहे. हे दोघेही बहिण-भाऊ वेगवेगळ्या कारणांमुळे बातम्यांमध्ये झळकत असतात. तसेच हे दोघेही अभिनय क्षेत्रातच पुढील करियरच्या वाटा शोधणार असल्याचेच दिसून येते. कारण रिपोर्ट्सनुसार आर्यनला फिल्ममेकर बनायचे असून त्याने लंडनची सेव्हनॉक्स स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने पदवीचे शिक्षण युनिवर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निया फिल्म स्कूल येथून पूर्ण केले आहे. त्याचबरोबर सुहाना खानने धिरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले असून ग्रॅज्यूएशन तिने इंग्लंडमधून पूर्ण केले आहे, त्यानंतर तीने न्यूयॉर्क युनिवर्सिटीत ऍक्टिंग कोर्ससाठी ऍडमिशन घेतले होते.

सर्वाधिक चर्चा होणाऱ्या स्टार किड्समध्ये सैफ अली खानची चारही मुलं आघाडीवर आहेत. त्यातही अमृता सिंग (amruta singh) आणि सैफ यांची मुलं इब्राहिम अली खान आणि सारा अली खान हे दोघेही आता करियर घडवण्याकडे लक्ष केंद्रीत करताहेत. इब्राहिमने युरोपमध्ये त्याचे उच्च शिक्षण पूर्ण केले असून त्यालाही अभिनय क्षेत्रात काम करायचे आहे. त्याने करण जोहरच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या आगामी चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे कामही केले आहे. उदयोन्मुख अभिनेत्रींपैकी एक असलेल्या साराबद्दल सांगायचे झाल्यास तिने मुंबईत शालेय शिक्षण घेतले असून न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिवर्सिटीमधून हिस्ट्री अँड पॉलिटीकल सायन्समध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.

सध्या नव्या अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरचे (janhavi kapoor) नावही आघाडीवर आहे. धडक तिचा लक्षवेधी चित्रपट ठरला होता… आई श्रीदेवी (shridevi) आणि बाबा बोनी कपूर (boni kapoor) यांची मुलगी असलेली जान्हवीनेही आई-वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत करियरसाठी अभिनय क्षेत्र निवडलं. तिने यासाठी लॉस एंजेल्समधून ली स्टासबर्ग थिअटर अँड फिल्म इंस्टीट्यूटमधून फिल्ममेकिंगचा कोर्स केला आहे. त्याआधी तिने मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

चर्चेत असणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. तिने मुंबईत तिचे शालेय शिक्षण घेतले असून अनेक रिपोर्टनुसार तिने लॉस एंजेल्समधील युनिवर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्नियामध्ये जर्नालिझम कोर्ससाठी ऍडमिशन घेतले होते. मात्र, त्याच्या मध्यातच तिला स्टुडन्ट ऑफ द ईयर २ हा चित्रपट ऑफर झाला त्यानंतर तिने हा कोर्स मध्यातूनच सोडला.

आजोबा बीग बी अमिताभ बच्चन आहेत म्हणल्यावर त्यांच्या नातवंडांची चर्चा होणे सहाजीकच आहे. त्यांची नात म्हणजेच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या ही सध्या शालेय शिक्षण घेत आहेत, तर अमिताभ यांची मुलगी श्वेता आणि जावई निखिल नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा ही देखील सातत्याने चर्चेत असते… तिने लंडनमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केली असून न्यूयॉर्कमधील फोरडॅम युनिवर्सिटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच अनेक रिपोर्ट्सनुसार तीला तिच्या वडीलांच्या बिझीनेसमध्ये काम करण्याची इच्छा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा