सिनेसृष्टीतून गायब झालेली ‘हिना’ फेम अभिनेत्री अश्विनी भावे आता आहे तरी कुठे? असे जगतेय तिचे आयुष्य


सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कलाकारांपैकीच एक आहेत, अभिनेत्री अश्विनी भावे. ९०च्या दशकात केवळ मराठीच नव्हे, अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी आपली छान ओळख निर्माण केली आहे. अतिशय मोजक्याच पण दमदार अशा भूमिका साकारत अश्विनी यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. पण तुम्हाला माहिती आहे का, अश्विनी आता कुठे आहेत?

व्यावसायिक आयुष्य जितके साध्ये सरळ होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही साधे सरळ राहिले. काही वर्षांपूर्वी अश्विनी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह विवाहबंधनात अडकल्या आहेत. अश्विनी यांचे पती एखाद्या अभिनेत्याप्रमाणे देखणे आहेत. लग्नानंतर त्या पतीसोबत अमेरिकेतच स्थायिक झाल्या. मात्र असे असूनही त्यांनी मराठी संस्कृती विसरलेली नाही, असे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येते.

आता चित्रपटात सक्रिय नसल्या, तरी अश्विनी सोशल मीडियावर मात्र बऱ्यापैकी सक्रिय असतात. या ठिकाणी त्या त्यांच्या पती आणि कुटूंबासोबतचे फोटो शेअर करतात. तसेच या जोडप्याच्या लग्नाला २० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, मात्र त्यांचे प्रेम पूर्वीसारखेच कायम आहे. याची झलक तुम्हाला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सहज पाहायला मिळेल. तसेच त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे, ज्यांच्यासोबतचेही फोटो अभिनेत्री शेअर करत असते. एकंदरीत असे दिसून येते की, अश्विनी आता त्यांच्या कौटुंबिक जीवनात चांगल्याच रमल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी ओटीटीद्वारे अभिनयात दमदार कमबॅक केलेला पाहायला मिळाला. (know all about henna fame actress ashvini bhave)

अश्विनी भावे यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी ‘शाबास सुनबाई’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’, ‘एक रात्र मंतरलेली’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ‘हिना’, ‘सैनिक’, ‘बंधन’ या चित्रपटांमध्ये त्या दिसल्या आहेत. शिवाय अश्विनी यांनी काही कन्नड चित्रपटात देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.