अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) गाजलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. १९९८ मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, सलमान खान अशी अनेक दिग्गज कलाकार मंडळी झळकली होती. याच चित्रपटातून अभिनेत्री सना सईदनेही (Sana Saeed) चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. यानंतर मात्र ती फारशी सिने जगतात दिसली नाही मात्र आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे ही अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे.
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसलेली अभिनेत्री सना सईदने तिच्या नुकत्याच केलेल्या बोल्ड फोटोशूटचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाची बिकिनी ब्रॅलेट आणि हिरव्या रंगाच्या जॅकेटवर शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. याशिवाय तिने हाय हिल बूट देखील घातले आहेत. सना सईदने काही तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडिओला 8 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर 150 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
या कमेंटमध्ये अनेकांनी तिच्या बोल्डलूकचे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे. सना सईद व्हिडिओमध्ये सोफ्यावर बसून बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. ज्यावर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. सनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिचे इंस्टाग्रामवर साडेसात लाख फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
सना सईदने याआधीही तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यांना खूप पसंती मिळाली आहे. सना सईदने ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘स्टुडंट ऑफ द इयर टू’, ‘बादल’ आणि ‘सोशल मीडिया मर्डर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ मध्ये दिसली होती. याशिवाय तिने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी अंजलीची भूमिका साकारली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- अतिशय आलिशान जीवन जगते अभिनेत्री काजोल, कोट्यवधींच्या गाड्या, लाखोंच्या साड्यांचे आहे चांगले कलेक्शन
- ‘डोला रे डोला’ गाण्याच्या शुटिंगवेळी ऐश्वर्या रायच्या कानातून वाहू लागले रक्त, तरीही पूर्ण केली शूटिंग
- शाहिर साबळेंच्या भूमिकेसाठी अंकुश चौधरी कशाला म्हणणाऱ्यांना निर्माते केदार शिंदेनी दिले सणसणीत उत्तर