Tuesday, June 18, 2024

‘छोरी’च्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी तयार झालीय पूजा सावंत, ग्लॅमरस फोटो पाहून चाहते अवाक्

मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ती तिच्या लुक्सने नेहमी सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या ग्लॅमरस लूकचे लाखो चाहते आहेत. सुंदर चेहरा आणि आकर्षक फिगर असणाऱ्या पूजाची फॅन फॉलोविंगही तगडी आहे. बऱ्याचदा आपले नवनवीन लूकमधील फोटो शेअर करून, ती चाहत्यांना पुरते वेडे करून सोडते. आता या बोल्ड अभिनेत्रीचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत. ज्यात तिचा ग्लॅमरस अंदाज भुरळ पाडणारा आहे.

नुकतेच तिने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हे फोटो पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यात पूजाने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. सोबतच ती फोटोसाठी मस्त पोझ देत आहे. हा लूक तिने ‘छोरी’ या हिंदी हॉरर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी केला होता. (lapachhapi fame pooja sawant ghetting ready for special screening of chhorii)

तिचे हे फोटो शेअर करता क्षणीच व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती. कारण यातील तिची सुंदरता कोणालाही मंत्रमुग्ध करणारी आहे. फोटोच्या कमेंट सेक्शनमध्येही तिच्या रूपाचे भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच काही तासातच या फोटोवर तब्बल ५६ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१० मध्ये आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. २०१९ मध्ये आलेल्या ‘जंगली’ या चित्रपटात ती विद्युत जामवालसोबत दिसली. यात तिने नायिकेची भूमिका साकारली होती. शिवाय तिने डान्स रियॅलिटी शोची परीक्षक म्हणून देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा