×

मनीष पॉलने घेतली स्मृती इराणींची भेट; चहाऐवजी पाजला काढा, तर अभिनेता म्हणाला, ‘काय वेळ आलीय…’

कोरोनाने आपल्या जीवनात प्रवेश केल्यापासून, आपले संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. सॅनिटायझर, मास्क, काढा आदी अनेक कधीही न वापरलेल्या गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. कोणाच्याही घरी गेल्यावर हातावर सॅनिटायझर मारून घरात घेतले जाते आणि चहा- पाणी ऐवजी काढा पाजला जातो. मनोरंजन क्षेत्र देखील यातून वाचले नाहीये. (Maniesh Paul Met With Smriti Irani Minister Smriti Iranis Fat To Fit Transformation)

नुकताच अभिनेता, सूत्रसंचालक, कॉमेडियन असलेल्या मनीष पॉलने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, ते फोटो आणि त्यांना दिलेले कॅप्शन खूप व्हायरल होत आहे. मनीषने नुकतीच केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि खासदार स्मृती इराणींची त्यांच्या घरी भेट घेतली. या भेटीचे काही फोटो मनीषने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “स्मृती इराणी मॅम या काढ्याच्या कपासाठी धन्यवाद, काय वेळ आली आहे, चहाच्या जागी आता काढा प्यावा लागतोय. पण धन्यवाद, मला बोलावण्यासाठी. मास्क फक्त फोटोसाठी काढला होता.”

View this post on Instagram

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul)

मनीषची ही पोस्ट स्मृती इराणींनी स्टोरी म्हणून शेअर केली आणि लिहिले की, “काढा युक्त, चिंता मुक्त.”

या पोस्टसोबतच नेटकऱ्यांमध्ये अजून एक चर्चा रंगताना दिसते आणि ती म्हणजे मनीषने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये स्मृती इराणींचा नवीन आणि आकर्षक लूक दिसत आहे. या फोटोंमध्ये स्मृती इराणी यांचे वजन कमी झालेले असून, त्या आता फिट दिसत आहेत. स्मृती इराणी यांचे आजचे आणि काही महिन्यांपूर्वीचे फोटो पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की, त्यांनी त्यांच्या फिटनेसवर लक्ष देत त्यांचे वाढलेले वजन कमी केले आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनच्या वेळचा उपयोग करत स्मृती इराणी यांनी हे ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.

स्मृती इराणी या टीव्ही इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा आहेत. २००० साली त्यांनी एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये मॉडेलिंगपासून सुरुवात करणाऱ्या स्मृती इराणी अनेकदा त्यांच्या वाढलेल्या वजनावर येणारे वेगवेगळे मिम्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आताच स्मृती इराणी यांचा नवीन लूक पाहून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समुद्रकिनारी ‘मिस्ट्री मॅन’चा हात पकडून धावताना दिसली जान्हवी कपूर; चाहते म्हणाले, ‘तो नशीबवान आहे तरी कोण?’

-चक्क पाण्यात झोपून दिली तिने पोझ; चाहत्यांना पाहायला मिळाली पूजा सावंतची ‘हॉट अन् हटके’ स्टाईल

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त

Latest Post