Friday, March 29, 2024

शाहरुख अन् रणवीरसारख्या कलाकारांचे चित्रपट २-३ वर्षांपासून नाही झळकले मोठ्या पडद्यावर, तरीही सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू यांच्याच नावावर

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एका वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रेक्षकांनी मोठ्या स्क्रीनवर कोणताही चित्रपट पाहिलेला नाही. कोरोनाची प्रकरणे पाहता, पुढील काही महिने हीच परिस्थिती राहील. मोठमोठ्या कलाकारांचे बरेचशे चित्रपट पेंडिंग आहेत. तसेच अक्षय कुमार, शाहरुख खान, रणवीर सिंग यांसारख्या कलाकारांचे चित्रपट तर गेल्या २- ३ वर्षांपासून मोठ्या पडद्यावर आले नाहीत. मात्र, मोठ्या पडद्यावर चित्रपटाची दृश्यमानता कमी झाली असली, तरीही शाहरुख आणि आमिर यांसारख्या कलाकारांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये फारसा फरक पडलेला नाही.

सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई’ चित्रपट १३ मे रोजी रिलीझ होणार आहे. अखेरच्या वेळेस, २०१९ मध्ये सलमानचा ‘दबंग ३’ आला होता. असे म्हणता येईल की, सलमान दर दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परततो. परंतु त्याचा आगामी ‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई’ ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलीझ करण्यात येत आहे. कारण यावेळी देशातील बहुतेक ठिकाणी लॉकडाऊन आहे.

तरीही सलमान खान ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, शाहरुख गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसला नाही. त्याचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ २०१८ मध्ये आला होता. तोही फ्लॉप झाला होता. शाहरुखचा शेवटचा हिट चित्रपट ‘रईस’ होता. हा चित्रपट २०१७ मध्ये आला होता. आता त्याचा पुढचा चित्रपट ‘पठाण’ २०२२ मध्ये येऊ शकतो. सध्या अन्य स्टार्स ओटीटीकडे वळत आहेत, परंतु शाहरुख अद्याप त्या मूडमध्ये दिसत नाहीये. तरीही शाहरुख ब्रँड एंडोर्समेंटच्या बाबतीत टॉप कलाकारांपैकी एक आहे.

कोणकोणते चित्रपट आले ओटीटीवर
अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ नंतर, आता सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई’ ओटीटीवर येत आहे. पण हे दोन्ही चित्रपट निर्मात्यांच्या निवडीमुळे नव्हे, तर लॉकडाऊन परिस्थितीमुळे ओटीटीवर आले आहेत. तसेच, शाहरुख आणि आमिर खान अद्याप ओटीटीकडे वळाले नाहीत. मात्र, ऋतिक रोशन ओटीटी वर वेब सीरिज बनवणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सोशल मीडियापासूनही वाढवले आहे अंतर
शाहरुखने गेल्या पाच महिन्यांत इंस्टाग्रामवर केवळ पाच पोस्ट शेअर केल्या आहेत. आमिरने तर सोशल मीडियाला केव्हाचाच रामराम ठोकला आहे. मात्र, या दोघांपेक्षा सलमान सोशल मीडियावर अधिक सक्रिय दिसतो आणि त्यात ‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई‘ रिलीझ होत आहे, त्यामुळे त्याची उपस्थिती वाढली आहे. तसेच, अक्षय कुमार यावर्षी ‘राम सेतू’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाल्याने सोशल मीडियावर दिसला आहे.

दमदार पात्र नाही मिळत, पण ऍड चांगल्या मिळतात
भारतीय सिनेमाच्या इतिहासात कॅटरिना कैफचे संस्मरणीय पात्र कोणते असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना बराच विचार करावा लागतो. परंतु ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कॅटरिनाने धमाल केली आहे. मोबाइल, हेअर ऑईल ते ज्यूस या ब्रँडमध्ये कॅटरिना दिसते. कदाचित दिशा पटानीही याच मार्गावर चालत आहे. दिशाने पाच वर्षात आठ चित्रपट केले आहेत. आता तिचा ‘राधे: योर मोस्ट वाॅंटेड भाई‘ रिलीझ होत आहे, पण ब्रँड एंडोर्समेंटमध्ये दिशा बरीच पुढे आहे.

एंडोर्समेंट बॉक्स ऑफिसवर नव्हे, तर चेहऱ्यावर चालते
सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनी बॉलिवूड आर्टिस्ट बँकेचे संचालक जावेद अली, यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ चित्रपट चालला नाही, परंतु लग्नानंतरही तिने तिची फिल्मी कारकीर्द आणि व्यावसायिक जीवन कायम ठेवले. मात्र, करीना कपूर आणि अनुष्का शर्मा बॅकफूटवर गेल्या आहेत. त्यामुळे बाजारात सध्या दीपिकाशिवाय दुसरा कोणताही चेहरा नाही. सध्या दीपिका व आलिया भट्ट या दोघींचे नाव जाहिरातींसाठी घेतले जाते. तसेच, आगामी काळात सारा अली खान कुठेतरी त्यांची जागा घेऊ शकते, असे म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे, चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाहिरातींमध्ये चालत नाही, तर चेहरा पुढे चालतो. यामुळेच, आजही अमिताभ बच्चन बर्‍याच जाहिरातींमध्ये दिसतात.

कलाकारांची २०२० मधील ब्रँड व्हॅल्यू
अक्षय कुमार- ११.८ (ब्रँड व्हॅल्यू)- २ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
रणवीर सिंग- १०.२९ (ब्रँड व्हॅल्यू)- ३ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
शाहरुख खान- ५.११ (ब्रँड व्हॅल्यू)- ४ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
दीपिका पदुकोण- ५.०४ (ब्रँड व्हॅल्यू)- ५ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
आलिया भट्ट- ४.८० (ब्रँड व्हॅल्यू)- ६ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
आयुषमान खुराणा- ४.८० (ब्रँड व्हॅल्यू)- ६ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
सलमान खान- ४.५० (ब्रँड व्हॅल्यू)- ८ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
अमिताभ बच्चन- ४.४२ (ब्रँड व्हॅल्यू)- ९ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
ऋतिक रोशन- ३.९४ (ब्रँड व्हॅल्यू)- १० (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)
वरुण धवन- ३.५२ (ब्रँड व्हॅल्यू)- १२ (ब्रँड व्हॅल्यूनुसार क्रम)

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नाद करायचा न्हाय! रागाच्या भरात धर्मेंद्र यांनी धरली होती राजकुमार यांची कॉलर, वाचा काय घडले होते नक्की?

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे

-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

हे देखील वाचा