Vijay Kadam Death | मराठी सिनेसृष्टीतून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. ते म्हणजे मराठी संस्कृतीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांचे आज 10 ऑगस्ट रोजी निधन झालेले आहेत. त्यांच्या या निधनाने सगळ्यांना दुःखद धक्का बसलेला आहे. गेल्या दीड वर्षापासून ते कर्करोगाने त्रस्त होते त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. परंतु या कर्करोगाशी झुंज देता देता आज त्याची शेवटी हार झालेली आहे आणि या जगाचा निरोप घेतलेला आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी सिनेसृष्टीने एक हिरा गमावलेला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच खूप वाईट वाटले आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अभिनेते विजय कदम यांच्या आज सकाळी त्यांच्या अंधेरी येथील घरीच निधन झालेले आहे. ते सध्या 67 वर्षाचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
विजय कदम यांनी रंगभूमीसोबत अनेक मराठी चित्रपटात देखील काम केलेले आहे. त्यांनी विच्छा माझी पुरी कर हे लोकनाट्य आणि खूमखुमी हे कार्यक्रम गाजवलेले आहे. त्यानंतर त्यांना खूप जास्त लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी चष्मेबहादूर, पोलीस लाईन, हळद रुसली कुंकू हसलं, आम्ही दोघ राजा राणी यांसारख्या चित्रपटात काम केले. आणि त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी जगाला पटवून दिली. आज त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. आणि कलाकार त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
पडल्यावर पुन्हा उठण्यासाठीच मी ओळखली जाईन ! हीना खानची पोस्ट चर्चेत…
किरण रावचा ‘लापता लेडीज’ दाखवला जाणार सर्वोच्च न्यायालयात! स्क्रीनिंग साठी कोर्टात पोचला आमीर खान