Sunday, July 14, 2024

मागील ३० वर्षांची परंपरा खंडित! सोनालीच्या घरी बसणार नाही गणपती, धक्कादायक कारण आले समोर

सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण दरवर्षी या खास सणाची वाट पाहत असतो. तसेच, प्रत्येकजण आवडीने आपल्या घरात गणपती बाप्पाचे थाटात आगमन करत असतो. मात्र, काही वेळा अशी परिस्थती ओढवते, ज्यामुळे विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे आगमन होत नाही. असेच काहीसे मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या बाबतीत घडले आहे.

सोनाली का बसवत नाहीये गणपती?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होत नाहीये. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा तिच्या घरात गणपती बाप्पा बसवला जात नाहीये. तिच्या लग्नानंतर हा दुसरा गणेशोत्सव आहे. मात्र, नुकतेच तिच्या आजीचे निधन झाले आहे, त्यामुळे तिचे कुटुंबीय यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नाहीयेत. सोनालीने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, तिने गणेशोत्सव का साजरा करणार नाही, त्याचे कारणही पोस्टमध्ये सांगितले आहे.

सोनालीची फेसबुक पोस्ट
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फेसबुकवर भावूक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या वर्षांत आम्ही यंदा पहिल्यांदाच गणपती बसवत नाहीयोत. आजी म्हणाली होती, मी गणपती येईस्तोवर थांबते, पण निदान त्या शारीरिक वेदनांतून तिची सुटका झाली. ती जिथे कुठे असेल शांत, समाधानी, आनंदी असेल असं वाटतेय. माझी लाडकी आजी आता माझ्या लाडक्या बाप्पाकडेच गेलीये. प्रिय आजी (आई), पुढच्या वर्षी, तू शिकवलंयस तसा, नेहमीप्रमाणे, तुझ्या मनासारखा गणेशोत्सव साजरा करू.”

विशेष म्हणजे, सोनालीने तिच्या या पोस्टसोबत काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो मागील वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यानचे होते. लक्ष वेधणारी बाब म्हणजे, सोनालीच्या कुटुंबात मागली 30 वर्षांपेक्षा जास्त काळ गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. मात्र, यावेळी हा खास सण सोनालीच्या घरात साजरा केला जाणार नाही.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची 2022मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तमाशा लाईव्ह’ या म्युझिकल सिनेमात झळकली होती. तिच्या खात्यात ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘व्हिक्टोरिया’ हे सिनेमेही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जे नव्हतं सांगायचं, तेच सांगून बसली शहनाज गिल; म्हणाली, ‘या’ व्यक्तीला सतत करते सोशल मीडियावर स्टॉक
दारा सिंग यांच्यासोबत दिसणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? बनलाय सुपरस्टार, एका सिनेमातून छापतो 100 कोटी
रणबीरच्या ‘या’ 5 चित्रपटांनी पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई, ‘ब्रह्मास्त्र’ मोडेल का रेकॉर्ड?

हे देखील वाचा