‘क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो’, सोनाली कुलकर्णीच्या नवीन फोटोंवर चाहते फिदा


‘अप्सरा आली’, म्हणत जिने आख्या महाराष्ट्राला वेड लावलं, आपल्या सौंदर्याने जिने सगळ्यांना भुरळ घातली, नजरेच्या एका इशाऱ्याने जिने समोरच्याला पुरते खल्लास केले ती मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. सोनाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने ती नेहमीच सर्वांना तिच्याकडे आकर्षित करत असते. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने चंदेरी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने कानात ईअरिंग घातले आहे. तसेच गळ्यात छोटीशी चैन घातली आहे. तसेच कपाळाला छोटीशी टिकली लावली आहे. या लूकमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Marathi actress sonalee Kulkarni share her photos on social media)

तिचा हा लूक देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. अशातच तिच्या एका चाहत्याने “गुलाबाची कळी,” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो.” तसेच बाकी चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट्स’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नेहमी प्रमाणेच खल्लास दिसतेस’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून कलाकार झाले फिदा

-प्रिया बापटने केला लाडू बनवतानाचा व्हिडिओ शेअर; ‘हा’ कलाकार म्हणाला, ‘मला पण पाहिजे’

-‘आली गौराई अंगणी…’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री समिधाने सुंदर फोटो केले शेअर; एकदा पाहाच


Leave A Reply

Your email address will not be published.