वर्कआऊटनंतर शाहिद कपूरची पत्नी मीराने केला मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम फिट


बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत (कपूर) ही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मीरा राजपूत तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत असते. ती अनेक वेळा तिचे फिटनेस सिक्रेट तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे सिक्रेट आणि फोटो खूप आवडत असतात. अशातच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि फिट दिसत आहे.

मीरा राजपूतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला तिचा एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. तिचा हा फोटो बघून समजत आहे की, तिने वर्क आऊट केल्यानंतर हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि काळ्या रंगाची लेगिंज परिधान केली आहे. यामध्ये ती आरश्या समोर पोझ देताना दिसत आहे.
तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या फोटोंचे कौतुक करत आहेत.

मीराने याआधी देखील तिच्या चाहत्यांना तिच्या वर्कआऊटची झलक दाखवली आहे. यावरून असे दिसत आहे की, मीरा फिट राहण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. याआधी तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती आंब्याच्या झाडासोबत वर्कआऊट करताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये ती तिच्या चाहत्यांसाठी फिटनेस गोल सेट करताना दिसत होती. तिचा हा व्हिडिओ देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. सगळेजण तिला कमेंट करून या व्हिडिओचे कौतुक करत होते.

तिने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले होते की, “काहीतरी नवीन ट्राय केले आहे. आता कोणतेही कारण चालणार नाही.” हा व्हिडिओ शेअर करून तिने तिच्या चाहत्यांना सांगितले होते की, परिस्थिती कशीही असली, तरीही आपल्याला आपल्या फिटनेसची काळजी घेतली पाहिजे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.