Monday, March 4, 2024

अय्याे! अमिताब बच्चनच्या नातवाने चक्क शाहरुखच्या लेकीला केले किस, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. सुहानाने अजून पदार्पण केले नसले तरी तिची फॅन फॉलोइंग खूप जबरदस्त आहे. सुहाना नेहमीच सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात चर्चेत असते. दरम्यान, सुहानाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अगस्त्य नंदा सुहानाला फ्लाइंग किस करताना दिसत आहे.

खरे तर, फॅशन डिझायनर तानिया श्रॉफच्या वाढदिवसाला बॉलिवूडचे सर्व स्टार किड्स पोहोचले हाेते. अशात या पार्टीत सुहाना खाननेही हजेरी लावली. या पार्टीत सुहाना व्यतिरिक्त आर्यन खान, खुशी कपूर, शनाया कपूर, अगस्त्य नंदा, निर्वाण खान, अंजिनी धवन देखील उपस्थित होते. सुहाना आणि अगस्त्यचा व्हायरल झालेला व्हिडिओ याच पार्टीचा आहे.

तानिया श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीतून परतत असताना, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा तिला सोडण्यासाठी तिच्या कारजवळ येतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाहरुख खानची मुलगी सुहाना बाहेर येताच तान्या, अहान शेट्टी आणि अगस्त्य नंदाही तिला बाहेर साेडवायला येतात. दरम्यान, अगस्त्य सुहानाला कारजवळ सोडण्यासाठी जातो आणि कारचा दरवाजा उघडतो. यानंतर तो सुहानाला स्टाईलमध्ये फ्लाइंग किस करतो. हा व्हिडिओ समोर येताच पुन्हा एकदा सुहाना आणि अगस्त्याच्या लिंक अपची चर्चा सुरु झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

सुहाना खान लवकरच जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सुहाना व्यतिरिक्त खुशी कपूर, अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफिलक्सवर प्रदर्शित होणार आहे. (megastar amitabh bachchan grandson agastya nanda give flying kiss to shah rukh khan daughter suhana khan video goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…

‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा