मिया खलिफाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, ‘एक वर्षाची थेरपी आणि प्रयत्न…’


ग्लॅमर जग मग ते बॉलिवूड असो किंवा अजून कोणते, या जगात नवीन जोड्या तयार होणे आणि जुन्या जोड्या तुटणे हे खूपच सामान्य आहे. नेहमी आपण अनेक कलाकारांच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकतो, बघतो. लहान मोठे असे अनेक कलाकार या यादीत समाविष्ट आहे. नुकतेच पूर्व पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफाने देखील ती तिच्या नवऱ्यापासून विभक्त होणार असल्याचे जाहीर केले आहे. 

मिया खलिफा हे नाव पॉर्न फिल्मसाठी खूपच प्रसिद्ध आहे. आज जरी मिया या क्षेत्रात कार्यरत नसली, तरी आजही तिची ओळख पॉर्नस्टार म्हणूनच होते. मियाने दोन वर्षांपूर्वी रॉबर्ट सँडबर्गसोबत लग्न केले होते. आज मियाने घटस्फोटाची घोषणा करत सर्वानाच धक्का दिला आहे. मियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

मियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही पूर्ण विश्वासाने हे सांगू शकतो की, आम्ही आमचे लग्न वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. एक वर्षाची थेरपी आणि प्रयत्न यानंतर आम्हाला समजले की, आमच्या एकमेकांप्रती भावना संपल्या आहेत. या भावना आणि प्रेम जपण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. आम्ही दोघं नेहमीच एकमेकांना प्रेम आणि आदर देऊ. कारण आम्हाला माहित आहे की, आमचे नाते हे कोणत्या एका घटनेमुळे किंवा एका कारणामुळे तुटले नसून, ते अशा गोष्टीमुळे तुटले आहे, जी कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे आमच्यापैकी कोणीही एकमेकांवर कोणताच आरोप प्रत्यारोप लावणार नाही.” (mia khalifa announced divorce)

पुढे मियाने लिहिले, “आम्ही कोणत्याही पश्चातापाशिवाय आमचे नाते संपवत असून, दोघं वेगवेगळी नवीन सुरुवात करत आहोत. मात्र त्यातही आम्ही आमचे कुटुंब, मित्र आणि आमच्या कुत्र्यांसाठी नेहमी सोबतच जोडलेले असू. हे कधीचेच झाले असते, पण आम्हाला आनंद आहे की, आम्ही आमचा वेळ घेऊन मग हा निर्णय घेतला. दूर जाताना देखील आम्ही हे म्हणू शकतो, की आम्ही पूर्ण प्रयत्न केले.”

मियाच्या या घोषणेनंतर अनेकजणं त्यांना पुन्हा विचार करायला सांगत आहे, तर काहींनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मियाने २०१४ साली पॉर्न इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. २०१६ साली तिने सांगितले की ती फक्त तीनच महिने या इंडस्ट्रीमध्ये होती. त्यानंतर तिने ती इंडस्ट्री सोडली. २०१९ साली तिने रॉबर्टसोबत एंगेजमेंट केली आणि जुन २०१९ मध्ये लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना


Leave A Reply

Your email address will not be published.