कास्टिंग काऊचवर मिनिषा लांबाचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘निर्माते ऑफिसऐवजी बाहेर…’


बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 8’ ची स्पर्धक मिनिषा लांबा ही मागील अनेक दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. नुकतेच अभिनेत्रीने सांगितले आहे की, तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा ती त्याच्या प्रेमात पडली आहे. यामध्येच अभिनेत्रीने एक असा खुलासा केला आहे की, जो ऐकून तुम्ही हैराण व्हाल. (Minissha Lamba made shocking revelations on the casting couch)

तिने सांगितले की, तिला इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. निर्मात्यांनी तिला रात्री घरी बोलावले होते. रेडिओ होस्ट सिद्धार्थ कन्नन‌सोबत बोलताना मिनिषाने सांगितले की, “कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये जिथे पुरुष असतात. तिथे अनेक पुरुष हे असे कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. ही इंडस्ट्री देखील यापेक्षा काही वेगळी नाहीये. मला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. जसे की, एखादा व्यक्ती चित्रपटाबाबत न बोलता म्हणतो की, तू रात्री डिनरला का नाही येत??” यानंतर तिने सांगितले की, ती जास्त करून निर्मात्यांना त्यांच्या ऑफिसवरचं‌ भेटायला जायची.

मिनिषाने सांगितले की, ती नेहमीच या गोष्टींकडे दुर्लक्ष करत गोष्टी टाळत असायची. तिने सांगितले की, या कारणामुळे तिला आलेले एक, दोन प्रोजेक्ट देखील गमवावे लागले होते. तिने सांगितले की, चित्रपटांचे निर्माते तिला ऑफिसऐवजी बाहेर भेटायला बोलावायचे.

मिनिषाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘हनिमून ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेड’, ‘बचना ए हसिनो’, ‘किडनॅप’, ‘वेल डन अब्बा’, ‘हम तुम शबाना’ यांसारख्या चित्रपटात काम‌ केले आहे. तसेच ती 2014 मध्ये टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस 8’ पर्वात दिसली होती. पण केवळ एका महिन्यातच ती या शोमधून बाहेर गेली होती. या दिवसात ती तिच्या पहिल्या डिजिटल प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार

-अनिल कपूरच्या ‘वो सात दिन’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; मुख्य अभिनेता म्हणून ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती

-लोकांची मदत करता- करता सोनूने सुरू केले आपले सुपरमार्केट; १० अंड्यांवर मिळतेय ‘ही’ जबरदस्त ऑफर


Leave A Reply

Your email address will not be published.