×

मदर्स डेच्या निमित्ताने पाहा मराठी कलाकारांचे त्यांच्या आईसोबतचे सुंदर फोटो

‘स्वामी तिन्हीं जगाचा आई विना भिकारी’. मे महिन्याचा दुसरा रविवार संपूर्ण जगात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. आज (८ एप्रिल) आपण सर्व मदर्स डे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत आहोत. आजच्या दिवशी आपण आपल्या आईचे आभार मानत त्यांच्याबद्दल असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करतो. आईची जागा कोणीही कोणत्याही किंमतीत घेऊ शकत नाही. आज सर्वच जणं त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा देत असून, आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांनी देखील त्यांच्या आईसोबत फोटो शेअर करत आईबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.

शशांक केतकर :
शशांकने त्याच्या आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले, “आई, तुझ्या शिवाय मी कोणीही नाही.”

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

अमृता खानविलकर :
मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटणाऱ्या अमृताने आईसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “तू तुझ्या असण्याने माझे आयुष्य उजळून टाकले आहेस…तुला खूप खूप प्रेम’.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

सायली संजीव :
मालिका आणि चित्रपटांमधील ओळखीला चेहरा असणाऱ्या सायली संजीवने देखील आईसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “आय लव्ह यु मां’

प्रिया बापट :
प्रिया बापटने तर तिच्या आई आणि वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. दोघांबद्दल तिने तिच्या पोस्टमधून लिहिले, असून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने पोस्टमध्ये लिहिले, “आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच आईकडे आता जादूची कांडी आहे, तुमच्या कडे आशिर्वाद आहेत. ते दोन्ही आमच्या पाठीशी असू देत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो.”

View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

मृण्मयी देशपांडे :
मृण्मयीने देखील आईसोबतचा एक छान फोटो शेअर केला असून लिहिले, “आय लव्ह यु आई”

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

गिरीजा प्रभू :
सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या गिरीजा प्रभूने आईला ‘मदर्स डेच्या शुभेच्छा आय लव्ह यु असे लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Girija prabhu (@girijaprabhu_official)

अभिज्ञा भावे :
अभिज्ञाने आईसोबतचा आताच आणि जुना फोटो शेअर करत लिहिले, “आई तू एक भावना आहे जी व्यक्त होऊ शकत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b)

अन्विता फलटणकर :
अन्विताने आईसोबतचा एक खूपच सुंदर फोटो शेअर करत लिहिले, “मैत्रिणी पेक्षाही जास्त बेस्ट फ्रेंड”

View this post on Instagram

A post shared by Anvita Phaltankar 🤪 (@anvita_phaltankar)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post