Saturday, April 20, 2024

BIRTH ANNIVERSARY | चित्रपटांशिवाय एनटीआर राजकारणातही लोकप्रिय होते, वयाच्या ७० व्या वर्षी केले दुसरे लग्न

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक एनटी रामाराव यांना एनटीआर या नावानेही ओळखले जाते. त्यांचे पूर्ण नाव नंदामुरी तारका रामाराव होते. आपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत, अभिनेत्याने एकूण 300 चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आणि चित्रपट निर्माता म्हणूनही अनेक चित्रपट केले. एनटी रामाराव यांचा जन्म २८ मे १९२३ रोजी झाला. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी-

एनटीआर यांनी १९४९ मध्ये तेलुगू चित्रपट मन देशमद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तेलुगू व्यतिरिक्त त्यांनी तमिळ आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले. आपल्या अभिनय कारकिर्दीत, एनटी रामाराव यांनी १७ वेळा चित्रपटांमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली. १९६१ मध्ये अभिनय केल्यानंतर, एनटी रामाराव यांनी सीताराम कल्याणा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले. ‘सम्राट अशोक’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर एनटी रामाराव यांनी वयाच्या २० व्या वर्षी १९४३ मध्ये बसवा तकाराम यांच्याशी पहिले लग्न केले. पहिल्या लग्नापासून त्यांना ८ मुले आणि ४ मुली झाल्या. यानंतर १९८५ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. या अभिनेत्याने नंतर तेलुगू लेखिका लक्ष्मी पार्वती यांच्याशी १९९३ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी लग्न केले, परंतु त्यांचे दुसरे लग्न एनटीआरच्या कुटुंबाने कधीही स्वीकारले नाही. एनटी रामाराव यांचा नातू ज्युनियर एनटीआर हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

दाक्षिणात्य चित्रपट आणि राजकारणातील एक मोठी व्यक्ती बनण्याचा रामाराव यांचा प्रवास खूप रंजक होता. ते १९८३ मध्ये पहिल्यांदा, १९८५ मध्ये दुसऱ्यांदा आणि १९९४ मध्ये तिसऱ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांनाही त्यांच्या राजकीय जीवनात अत्यंत कठीण दिवसांचा सामना करावा लागला. एनटीआर यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष या दोन्ही पदांवरून हटवले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने रामारावांना १९६८ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केले. अखेर १८ जानेवारी १९९६ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी हैदराबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा