Neelam Giri Dance | भोजपूरी ट्रेंडिंग गर्ल ‘नीलम गिरी’चा ‘सिटी मारो’ गाण्यावर नादखुळा डान्स, स्टेप्स तर पाहा

भोजपूरी गाणी हि मुळातच थिरकायला लावणारी ठसकेबास असतात. त्या गाण्यावर नाचण्याचा आनंद आणि मोह अनेकांना हवाहवासा वाटतो. याच गाण्यांच्या जोरावर अनेक भोजपूरी अभिनेत्री प्रसिद्ध डान्सर म्हणून नावारुपाला आल्या आहेत. नीलम गिरी (Neelam Giri) ही देखील भोजपुरीची सध्याची ट्रेंडिंग गर्ल म्हणून गणली जाते.

नीलम गिरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वतः शी संबंधित पोस्ट शेअर करत असते. मग तो डान्स व्हिडिओ असो किंवा म्युझिक व्हिडिओ असो.

View this post on Instagram

A post shared by Neelam Giri ???? (@neelamgiri_)

नीलमने नुकताच इंस्टाग्रामवर स्वतःचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात आपण पाहू शकतो की व्हिडिओमध्ये तिने लेहेंगा घातला आहे. या व्हिडिओतून ती तिच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. तीचा डान्स आणि अदाकारी ही खऱोखरच आकर्षक वाटत आहे.

हेही वाचा – भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव आहे तब्बल ‘इतक्या’ कोटीच्या संपत्तीचा मालक, आकडा ऐकाल तर व्हाल स्तब्ध

नीलम गिरीने तिचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तीने भोजपुरी गाने ‘सिटी मारो'(seeti maaro) या गाण्यावर शानदार डान्स केलाय. तिच्या व्हिडिओला आतापर्यंत लाखाहून अधिक लाइक्स मिळालेत. तर व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलाय. एका चाहत्याने तर अशी कमेंट केलीये की, ‘तुमचा व्हिडिओ सगळ्यांच्या हृदयाला भेदून जात आहे’

View this post on Instagram

A post shared by Neelam Giri ???? (@neelamgiri_)

अभिनेत्री नीलम गिरी इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर ७ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. आता तिच्या भोजपुरी गाण्याच्या ‘सिटी मारो ‘ या गाण्याच्या मुळ व्हिडीओचा विचार केला तर हे गाणे अरविंद अकेला कल्लू (Arvind Akela kallu) यांनी गायले आहे. या गाण्याचा व्हिडिओ अभिनेत्री नीलम गिरीवर चित्रीत करण्यात आला होता.

हेही वाचा –

Latest Post