×

नीना गुप्ता यांच्या प्रेग्नंसीवेळी मित्राने दिला होता ‘गे’ व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला; अभिनेत्रीचा पुस्तकातून खुलासा

सामान्य लोकांना नेहमीच या ग्लॅमर दुनियेचे खूप आकर्षण आणि कौतुक राहिले आहे. पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता या अदृश्य आणि अस्थिर बांबूंवर असलेले हे आभासी जग आहे. या जगात जेव्हा तुम्ही वावरायला लागता, तेव्हा तुम्हाला हे जग किती पोकळ आहे याचा अंदाज येतो. कलाकार म्हटले की, सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच असतात. समाजाचे, प्रत्येक पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा मोठा परिणाम त्यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यावर होत असतो. कलाकार देखील माणूस असल्याने त्यांच्या हातून देखील नकळत काही चुका होतच असतात. अशीच एक चूक अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या हातून देखील झाली होती.

सध्या अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकांमुळे खूपच चर्चेत आल्या आहे. नीना यांनी नुकतेच त्यांचे ‘सच कहूं तो’ हे पुस्तंक लाँच केले. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठे खुलासे केले आहेत. या खुलाशामुळे नीना प्रचंड चर्चेत आल्या आहेत. नीना आणि वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्या नात्याबद्दल सर्वानाच सर्व माहिती आहे. या पुस्तकात नीना यांनी जेव्हा त्या त्यांच्या विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्यातून प्रेग्नेंट झाल्या, त्यानंतर त्यांचा मित्र असलेल्या सुजॉय मित्राने त्यांना एका समलैंगिक बँकर असलेल्या माणसासोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

तो बँकर सामाजिक दबावामुळेच लग्न करणार होता. मात्र, त्याला नीना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळासोबत काही संबंध ठेवायचा नव्हता. त्याने हे सर्व आधीच सांगितले होते की, तो नीना यांच्या बाळाला त्याचे नाव देईल पण त्याचा नीना आणि त्यांच्या बाळाशी कोणताच संबंध राहणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

हे ऐकून नीना हसल्या आणि त्यांच्या मित्राला म्हणाल्या, “मला फक्त वादांपासून वाचण्यासाठी लग्न करणे योग्य वाटले नाही आणि मी या लग्नाला नकार दिला. मला माहित आहे की, पुढे मला खूप मोठ्या आणि अवघड प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार आहेत. एक कलाकार आणि पब्लिक फिगर असल्यामुळे माझ्या वैयक्तिक जीवनावर आणि चुकांवर प्रश्न उपस्थित होणारच होते. मात्र, जेव्हा मी या समस्यांचा सामना करेल, तेव्हा सर्व सांभाळून घेईल. तेव्हापर्यंत सैल कपडे घालून जोपर्यंत लपवता येईल तोपर्यंत लपवेल.”

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी नीना गुप्ता यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली होती, आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला देखील ते सांभाळायला तयार होते. पण नीना यांनी त्यांना नकार दिला आणि एकटे राहणे पसंत केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने शोधली कोरोना लस घेण्याची नवीन पद्धत; एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

-आनंदाची बातमी! ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट

-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट

Latest Post