Wednesday, November 13, 2024
Home बॉलीवूड ‘मुंबई सागा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, आकडा वाचून बसेल शॉक

‘मुंबई सागा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, आकडा वाचून बसेल शॉक

बॉलिवूड सुपरस्टार जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट शुक्रवारी (19 मार्च) सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या कमाईने ही गोष्ट सिद्ध केली आहे. मुंबई सागा हा चित्रपट लॉकडाऊननंतर रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे.

काही ठिकाणी सामाजिक अंतर लक्षात घेऊन चित्रपटगृहात केवळ 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी होती. तरीदेखील या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 2.82 कोटी एवढी झाली आहे. यावरून प्रेक्षकांचा प्रतिसाद दिसून येतोय. जवळपास एका वर्षानंतर चित्रपटगृह हाऊसफुल झाले आहेत.

देशातील अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यु आणि अनेक काही बंधने लक्षात घेता चित्रपटाचा बिसनेस चांगला झाला आहे, असे म्हटले जात आहे. परंतु ज्या ठिकाणी कर्फ्यु नव्हता त्या ठिकाणी खूप गर्दी झालेली दिसून आली.

‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे संजय गुप्ता यांनी दिग्दर्शन केले आहे. त्यांचा ‘आतिश’, ‘कांटे’, ‘शूट आऊट ॲट लोखंडवाला’, ‘शूट आऊट ॲट वडाला’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूपच भावली होती. सत्यघटनेवर आधारित असलेला ‘मुंबई सागा’ चित्रपटाची कथा अंडरवर्ल्डचा चर्चित अमर नाईक आणि अश्विन नाईक यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

या चित्रपटात जॉन अब्राहमचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. खूप मेहनतीने त्याने ही भूमिका निभावली आहे. असे ऍक्शनवाले अनेक चित्रपट त्याने केले आहेत, आणि सगळ्या चित्रपटात तो सारखाच दिसत आहे.

यापूर्वी रिलीज झालेला ‘रूही’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3.06 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बघावं ते नवलंच! सामान्य पद्धतीने कपडे परिधान करण्याचा कंटाळा आल्याने, अभिनेत्रीने केलं ‘असं’ काही; पाहा व्हिडिओ

-‘सेक्सी लेडी ऑन द फ्लोर’ अभिनेत्री प्राची सिंगच्या व्हिडिओवर चाहत्याची भन्नाट कमेंट, पाहा व्हिडिओ

-भोजपुरी होळीगीतांची धमाल कायम! ‘निरहुआ’चं नवीन गाणं जबरदस्त व्हायरल

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा