Latest Posts

नोरा फतेहीचे ठुमके पुन्हा एकदा लावणार चाहत्यांना वेड; ‘या’ दिवशी रिलीझ होणार ‘जालिमा कोका कोला’ गाणं


नोरा फतेही म्हटले की, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो तिचा जबरदस्त मूव्ह्ज असलेला धमाकेदार डान्स. नोराने परदेशातून भारतात येत तिच्या डान्सने अगदी कमी वेळात स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे. सुरुवातीला चित्रपटांमध्ये फक्त डान्ससाठी दिसणारी नोरा, आता अजय देवगणच्या आगामी ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणारा हा सिनेमा येत्या १३ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील नोरावर चित्रित झालेल्या ‘जालिमा कोका कोला’ या गाण्याचा टिझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/CRlJhLqp9yp/?utm_source=ig_web_copy_link

टी-सिरीजने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या गाण्याचा टीझर प्रदर्शित केला आहे. काही सेकंदाच्या या टीझरमध्ये नोराचा अनोखा आणि दिलखेचक अंदाज सर्वानाच घायाळ करत आहे. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नोराच्या मादक अदा या गाण्याबद्दल लोकांच्या उत्सुकतेत भर घालत असून, नोराचे ठुमके, तिचे लटके झटके या गाण्याला चार चाँद लावत आहे. या गाण्याच्या फक्त टीझरनेच लोकांना वेड लावले आहे. (nora fatehi zalima coca cola song teaser release)

https://youtu.be/wxSbejzh3f0

नोराचे हे नवीन ‘जालिमा कोका कोला’ हे गाणे २४ जुलैला प्रदर्शित केले जाणार. या टीझरला नोराच्या फॅन्सने आणि नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. नोराने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या गाण्याची माहिती दिली होती. ‘जालिमा कोका कोला’ हे गाणे श्रेया घोषालने गायले, असून संगीत तनिष्क बागची दिले आहे, तर वायुने या गाण्याचे शब्द लिहिले आहे.

अभिषेक दुधैया दिग्दर्शित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. अजय देवगण या चित्रपटात तत्‍कालीन भुज एयरपोर्टचे इनचार्ज असलेल्या विजय कर्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यात १९७१ सालातल्या भारत पाकिस्तान युद्धाची गोष्ट पाहायला मिळणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

जान्हवी कपूरने स्टेजवर चुलती महीप कपूरसोबत लावले ठुमके; ‘नदियों पार’ गाण्यावरचा परफॉर्मेंस तूफान व्हायरल

अनुपम खेर यांनी शेअर केला त्यांच्या टफ वर्कआऊटचा व्हिडिओ; फिटनेस बघाल तर व्हाल हैराण

‘पुन्हा भेटले यारी दोस्तीतील यार दोस्त!’, अभिनेता हंसराज जगतापने केला व्हिडिओ शेअर 


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss